औरंगाबाद : गुरुवारी दुपारी येथे आमदार विनायक मेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित बैठकीत गोंधळ घालणाऱ्या नऊ जणांविरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अभिमन्यु माकणे (रा. पडेगाव) यांनी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी अंबादास म्हस्के, किसन घनवट, नवनाथ मुळे, सचिन घनवट, राहुल यलदी तसेच अन्य चार ते पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल […]
ताज्याघडामोडी
महावितरण कर्मचाऱ्यांना नगरसेवकाकडून बेदम मारहाण
नंदुरबार – जिल्ह्यातील शहादा शहरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी थकित वीज बिल वसुलीसाठी खेतिया रोडवरील भारत डेअरीवर गेले असता त्यांना नगरसेवक व इतर दोघांकडून शिवीगाळ करीत बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी नगरसेवक व इतर दोघांविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तसेच महावितरण कंपनीच्या कृतिसमितीने एकत्रित येत […]
पतीच्या जागी नोकरी मिळवण्यासाठी पत्नीनं रचला कट; हत्येसाठी प्रियकरालाच दिली 3 लाखाची सुपारी
नुकत्याच झालेल्या वटपौर्णिमेनिमित्त पतीला वाचवणाऱ्या सावित्रीच्या कथेला उजाळा मिळाला. समाजातल्या अनेक सावित्रींच्या कथा वृत्तपत्रं, सोशल मीडियावर झळकल्या. त्याचवेळी झारखंडमधल्या एका ‘सावित्री’नं नोकरीच्या लालसेपोटी नवऱ्याचा जीव घेतल्याची घटना उघडकीस आली. या पत्नीनं आपल्या प्रियकरालाच आपल्या पतीला ठार मारण्यासाठी तीन लाख रुपयांची सुपारी दिली होती. रामगड जिल्ह्यातल्या बडकाकाना रेल्वे पोलिसांनी ही खुनाची घटना उघडकीस आणली मृत रवींद्र […]
महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण प्रकरणी चार पोलिसांविरोधात गुन्हा
पुणे – पुणे शहरातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात चार महिला पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेल्या महिला पोलीस कर्मचाऱ्यांसोबत सहायक फौजदाराने मोबाईलवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली. तर त्याच महिलेस तीन महिला पोलिसांकडून मारहाण करून धमकी देण्यात आली. फिर्यादी महिला पोलीस कर्मचाऱ्याने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]
‘कोविशील्ड’ आणि ‘कोव्हॅक्सिन’ कोरोनाच्या अल्फा, गामा, बीटा, डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक; सरकारने दिली माहिती
नवी दिल्ली : वृत्त संस्था – Covishield and Covaxin |भारतात तयार करण्यात आलेली कोव्हॅक्सिन (Covaxin) आणि कोविशील्ड (Covishield) दोन्ही व्हॅक्सीन कोरोना व्हायरस ची चिंता वाढवणार्या सर्व व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी आहेत. सरकारने दावा केला की, दोन्ही व्हॅक्सीन कोरोनाच्या अल्फा, बीटा, गामा आणि डेल्टा व्हेरिएंट्सच्या विरूद्ध परिणामकारक आहेत. डेल्टा प्लसबाबत सध्या अभ्यास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यापूर्वी आरोग्य […]
ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी
ओबीसींचे राजकीय आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी राज्य सरकारने ओबीसीची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी पंढरपूर- वर्षानुवर्षे न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थेमधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निकालावरून धोक्यात आलेले आहे. दि.4 मार्च 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयाने विकास किशनराव गवळी नि. महाराष्ट्र सरकार (रिट याचिका क्र.980/2019) या खटल्याच्या निकालानुसार अकोला, वाशिम, गोंदिया, नागपूर, धुळे व […]
खासदार, आमदार, नगरसेवकांना आता सहकारी बँकांमध्ये संचालक होता येणार नाही
मुंबई: देशात आजपर्यंत ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या हातात सत्ता असते असं म्हटलं जात. मग त्यासाठी काही लोक बँक साखर कारखाने किंवा पतपेढी आपल्या नावावर करू राजकारणात आपला दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र या वृत्तीला आता खुद्द आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अतिशय महत्वाचा निर्णय दिला आहे. आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील बँकांसंदर्भात एक […]
SBI ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 1 जुलैपासून कॅश विड्रॉल आणि चेक बुकच्या नियमात बदल होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती
नवी दिल्ली : भारतीय स्टेट बँक (एसबीआय) च्या ग्राहकांसाठी 1 जुलै 2021 पासून बर्याच गोष्टी बदलल्या जात आहेत. यामध्ये बँक एटीएममधून रोख रक्कम काढणे आणि अन्य वित्तीय संस्थेच्या शाखेत चेक बुक देणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. एसबीआयने हा बदल बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यावर अर्थात बीएसबीडीवर लागू केला आहे. याअंतर्गत, आता एका महिन्यात केवळ 4 व्यवहार विनामूल्य असतील, […]
कोयत्यासह सोशल मीडियावर टाकलेली पोस्ट आली अंगलट
पिंपरी- एका गुन्हेगाराने सोशल मीडियावर हातात कोयता घेऊन त्याखाली भाईगिरीचे भलेमोठे कॅप्शन देऊन पोस्ट व्हायरल केली होती. स्वप्नील उर्फ युवराज सुरेश गायकवाड (वय 23, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे पोस्ट शेअर करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. पोस्टद्वारे त्याने गुन्हेगारीचे उदात्तीकरण केले. त्याच्यावर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकाने कारवाई केली आहे. गुंडाविरोधी पथकातील पोलिस शिपाई रामदास कुंडलिक मोहिते यांनी […]
राज्यात डेल्टा प्लस विषाणूने पहिला मृत्यू; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
राज्यात डेल्टा प्लस विषाणू संसर्ग झालेल्या रुग्णाचा पहिला मृत्यू रत्नागिरी जिल्ह्यात झाला आहे. 13 जून रोजी 80 वर्षीय आजीचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर आजीला डेल्टा प्लसची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत माहिती दिली. डेल्टा व्हेरियंटमुळे एक रुग्ण दगावला आहे, असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितलं. डेल्टा व्हेरिएंट […]











