ताज्याघडामोडी

रेमडेसिवीर’चा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी – प्रांताधिकारी गजानन गुरव

पंढरपूर, दि. 20 :-  तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची वाढ मोठ्याप्रमाणात होते आहे.  कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्राशानाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच कोरोना बाधित रुग्णांना आवश्यकतेनुसार देण्यात येणारे रेमडेसिवीर इंजेक्शन बाबत खाजगी रुग्णालयांनी कोविड नियमांचे तंतोतंत पालन करावे , या इंजेक्शनचा कुठेही काळाबाजार अथवा गैरवापर होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना […]

ताज्याघडामोडी

पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील 50 टक्के लस द्याव्यात

पंढरपूर- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली असून यामुळे या दोन्ही तालुक्यात कोरोना रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे येथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर लसी पैकी पन्नास टक्के लसीकरण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात करावे अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

लाच प्रकरणातील ‘त्या’ मुख्याध्यापकाची शिक्षा हायकोर्टाने केली रद्द  

शिक्षण संस्थेस शासकीय मान्यता मिळवून देतो असे सांगत १ लाख रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून सातारा पोलिसांनी केलेल्या कारवाईत मुख्याध्यापकास अटक करून खटला दाखल करण्यात आला होता.या प्रकरणी सातारा सत्र न्यायालयाने सदर मुख्याध्यापकास तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती.या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते. सदर प्रकरणी गुन्हा दाखल करताना शिक्षण विभागाने अस्तित्वातील आदेश आणि […]

ताज्याघडामोडी

तुम्ही नागपुरी बांगड्या भरला होत्या का?

राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या कठोर टीकेनंतर आता भाजपा आणि राष्ट्रवादीतील अनेक नेते आमने सामने येऊ लागले असून दोन्ही बाजूने टीकेचा भडीमार सुरु असल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे  यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस  यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना माळशिरसचे भाजप आमदार राम सातपुते  त्यानंतर सातपुतेंना उत्तर देताना खडसेंच्या कन्या रोहिणी […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भरचौकात ‘लेडी डॉन’ची  चाकूने वार करून हत्या 

वस्तीत दबंगगिरी करणारी पिंकी शर्मा हिची हत्या करण्यात आली. चाकूने सपासप वार करुन पिंकीची निर्घृण हत्या करण्यात आली. वादावादीतून दोघांनी पिंकीला संपवल्याचा आरोप आहे. नागपुरात भरदिवसा घडलेल्या हत्याकांडाने एकच खळबळ उडाली आहे.नागपूर शहरातील तांडापेठेत भरचौकात पिंकी शर्माची हत्या करण्यात आली. अवैध धंदे करणाऱ्या व्यक्तींना पिंकी शर्मा धमक्या देत असल्याचं बोललं जातं. सोमवारी दुपारी पिंकीचा आरोपींसोबत वाद […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलिस असल्याची बतावणी करत दागिने केले लंपास

सांगली येथील एका अज्ञाताने पोलीस असल्याचे बतावणी करून आप्पासाहेब पाटीलनगरमधील महिलेचे २ तोळ्यांचे दागिने लंपास केले आहे. हि घटना शनिवारी घडली आहे. मंगल दिलीप नाईक (वय ५८, रा. आप्पासाहेब पाटीलनगर, सांगली ) या महिलेने या प्रकरणावरुन सांगली शहर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. यावरून शहर पोलिसांकडून त्या अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहितीनुसार, […]

ताज्याघडामोडी

नोंदणीकृत फेरीवाल्यांना लवकरच मिळणार राज्य शासनाकडून दीड हजराची आर्थिक मदत

राज्यातील 25 लाख नोंदणीकृत घरेलू कामगारांसाठी 375 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. राज्यातील 5 लाख नोंदणीकृत फेरीवाल्यांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 75 कोटी रुपयांची मदत देण्यात येणार आहे. 12 लाख परवानाधारक रिक्षाचालकांना प्रत्येकी दीड हजार रुपयांप्रमाणे 180 कोटी रुपये मदत देण्यात येणार आहे.ही मदत देतांना सायकल रिक्षाचालकांचाही विचार करण्यात आला आहे. आदिवासी विभागांतर्गत खावटी […]

ताज्याघडामोडी

आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार

कोरोना लसीकरणाबाबत मोठी बातमी समोर येत आहे. आता 18 पेक्षा जास्त वयाच्या सर्व व्यक्तींना कोरोना लस दिली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. 1 मे पासून लसीकरणाचा पुढचा सर्वात मोठा टप्पा आता सुरू होणार आहे. ज्यामध्ये 18 पुढील सर्व वयाच्या लोकांना लस दिली जाणार आहे. देशात जानेवारीपासून लसीकरण सुरू झालं. टप्प्याटप्प्याने […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

भाजपा आमदाराच्या गाडीच्या काचा फोडल्या

बुलडाणा, 19 एप्रिल : बुलडाण्यात शिवसेना (Shivsena)आणि भाजपमध्ये वाद आता शिगेला पोहोचला आहे. भाजप आमदार संजय कुटे यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्याची घटना समोर आली आहे. संजय कुटे यांनी हा हल्ला सेनेचे आमदार संजय गायकवाड  यांच्या समर्थकांनीच केल्याचा आरोप केला आहे. ‘मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी ते देंवेंद्र फडणवीसांच्या तोंडातच कोंबून टाकले […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! कोरोना रुग्णावर मांत्रिकाकडून उपचार; महिलेचा मृत्यू

अमरावती, 17 एप्रिल: महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्याचा मेळघाट परिसर अतिशय दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो. याठिकाणी अंद्धश्रद्धेला खातपाणी घालणाऱ्या अनेक घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली असून मेळघाटात कोरोनाबाधित रुग्णावर एक मांत्रिक उपचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कोरोनाबाधित महिलेवर उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाल्यानं ही घटना […]