राज्यातील रोज वाढणारी कोरोना बाधितांची संख्या,ऑक्सिजन अभावी तडफडून मरत असलेले रुग्ण,रेमिडिसीवीर चा तुडवडा आणि केंद्राचे असहकार्य यामुळे राज्यातील परिस्थिती आता हाताबाहेर चालली असल्याचे दिसून येत असुन गेल्या वर्षभरापासून अतिशय धैर्याने परिस्थिती हाताळणारे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आता केंद्राला आर्त विनवणी केली असून तुमच्या पाया पडतो,हात जोडतो पण कबूल केल्याप्रमाणे २६ हजार रेमिडीसीवर इंजेक्शन तातडीने द्या […]
ताज्याघडामोडी
भारताचा एका दिवसात कोरोना रुग्ण वाढीचा जागतिक विक्रम
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गेल्या २४ तासांत जगभरातील सर्वाधिक रुग्ण एकट्या भारतात आढळले आहेत. त्यामुळे देशातील कोरोना रुग्णसंख्येने जगभरातील सर्व रेकॉर्ड ब्रेक करत आज ३ लाखाहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासात देशात ३ लाख १४ हजार ८३५ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून २०१४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ […]
गृहमंत्र्यांच्या नावाने पाच लाखांची मागणी करणाऱ्या पीआयची चौकशी
पुणे:कारवाई टाळण्यासाठी पाच लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील बार्शीचे पोलिस निरिक्षक संतोष गिरीगोसावी यांची चौकशी उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांनी सुरु केली आहे. बारामतीचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या संदर्भतील चौकशी निपक्षपातीपणे व्हावी या साठी विशेष पोलिस महानिरिक्षकांनी मिलिंद मोहिते यांना बार्शी येथे पाठवले होते. त्या संदर्भात […]
रुग्ण दगावल्याने नातेवाईकांंकडून डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड
पुण्यातील कोंढवा परिसरातील प्राईम हॉस्पिटलमध्ये आणलेला रुग्ण दगावल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी डॉक्टरांना मारहाण करत रुग्णालयाची तोडफोड केली. मंगळवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी पंधरा ते वीस जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी डॉक्टर सिद्धांत उदयकुमार तोतला (वय 25) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेबारा […]
राज्यातील ‘या’ भागात पुढील चार दिवस पावसाची शक्यता!
मराठवाड्यातील नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात 24 एप्रिल रोजी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. पुणे शहरात सध्या उन्हाचा कडाका कमी झाला असला तरी रात्रीच्या तापमानात वाढ झाली आहे. दरम्यान, यंदा पाऊस समाधानकारक होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येणार आहेत. येणारा पावसाळा देशभरात समाधानकारक असेल, असा अंदाज […]
35 हजारात remdesivir चे इंजेक्शन, धक्कादायक प्रकार समोर
नालासोपारा, 20 एप्रिल : कोरोनाच्या महामारीत रेमडेसीवीरची मागणी वाढल्याने त्याचा काळाबाजार करून रुग्णांच्या नातेवाईकांची पिळवणूक करून लुटारू सक्रीय झाले होते. नालासोपारा येथील महिलेने दिलेल्या माहितीमुळे रेमडेसीवीरचा काळाबाजार उजेडात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून एका त्रिकुटाला अटक करून 3 इंजेक्शन व 3 मोटारसायकल जप्त केल्या आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वी धानीव बाग येथील […]
राज्यातील तुरुंगांमध्ये कोरोनाचा स्फोट, धक्कादायक आकडेवारी समोर!
मुंबई, 20 एप्रिल : कोरोनाच्या वाढत्या आकडेवारीचं संकट समोर उभं ठाकलेलं असतानाच आता सरकारसमोर आणखी एका संकटानं डोकं वर काढलं आहे. ते म्हणजे राज्यातील तुरुंगांमध्ये असलेल्या रुग्णांना होणारा कोरोना संसर्ग. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये कोरोनाचा स्फोट झाल्याचं पाहायला मिळत आहे. कैद्यांबरोबरच तुरुंगातील कर्मचारीही मोठ्या प्रमाणावर कोरोनाग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातल्या विविध कारागृहांमध्ये सध्या कोरोनाग्रस्त कैद्यांच्या […]
शिवभोजन केंद्रांवर गैरव्यवहार होणार नाही याची दक्षता घ्या,निकृष्ट दर्जाचे अन्न वितरित होत असेल तर कठोर कारवाई करा !
राज्य सरकारने लागू केलेल्या निर्बंधांच्याकाळात गोरगरिबांसाठी शिवभोजन थाळी महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. राज्यातल्या सर्व शिवभोजन केंद्रांना आपण दिडपट जास्त थाळ्या वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्या सर्व गरजू आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी आपणा सर्वांची असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी आज सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवभोजन थाळी आणि […]
आमच्या भांडणात का पडला ? असा जाब विचारत मध्यस्थावरच तलवारीने वार
आठ दिवसापूर्वीच्या भांडणाचा राग मध्यस्थावर काढत तू आमच्या भांडणात का पडला असा जाब विचारत भांडणे सोडविणाऱ्या मध्यस्थावरच तलवारीने वार करण्यात आल्याची घटना पुणे येथील खडकमाळ अळी येथील मनपा कॉलनीमध्ये घडली. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी रोहीतचा मित्र रेतिष व आरोपी यांच्यामध्ये आठ दिवसांपुर्व भांडणे झाली होती. […]
मोठी बातमी! राज्यात कडक लॉकडाऊन लागणार
मुंबई- राज्यात कठोर निर्बंध लावून सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. काही तासांत लॉकडाऊनबाबतच्या गाईडलाईन्स जारी करण्यात येतील, असंही ते म्हणाले आहेत. दुसरीकडे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी लॉकडाऊनचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील, असं म्हटलं आहे. त्यामुळे […]











