*कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी सर्व ठेकेदारांनी त्यांच्याकडील कामगारांची संख्या व माहिती त्वरित प्रशासनाला द्यावी *महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडे कामगार म्हणून नोंदणीसाठी कामगारांना संबंधित ठेकेदाराकडून 90 दिवस बांधकाम कामगार म्हणून काम केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक सोलापूर, दि. 12(जिमाका):- कामगार विभाग अंतर्गत कामगाराच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार […]
ताज्याघडामोडी
पंढरपूर तालुक्यातील प्रलंबित विकास कामे तातडीने मार्गी लावावीत – आमदार समाधान आवताडे
पंढरपूर : – दि.12, – पंढरपूर तालुक्यातील मंजूर विकास कामांची निविदा प्रक्रिया तात्काळ पूर्ण करून संबंधित खात्यातील प्रलंबित असलेली विकास कामे तात्काळ पूर्ण करावीत अशा सूचना आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या. शेतकी भवन पंचायत समिती पंढरपूर येथे आमदार समाधान आवताडे यांच्या उपस्थित तालुक्यातील विविध विकास कामाबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी माजी […]
माढा येथे खा.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर संपन्न आमदार अभिजीत पाटील यांनी शरद पवार यांची दिल्लीत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या
(हजारो नागरिकांनी सहभाग नोंदवून घेतला शिबिराचा लाभ) (आमदार अभिजीत पाटील मित्रपरिवार व माढा शहर व तालुका राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन) पंढरपूर प्रतिनिधी /- राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या ८५ वा वाढदिवस माढा शहर व तालुक्यात विविध सामाजिक कार्यक्रमाने तसेच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. देशाचे नेते शरदचंद्र पवार यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्त […]
श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान छञपती संभाजीनगर चा प्रतिष्ठेचा मानाचा यंदाचा धर्मभुषण पुरस्कार काकासाहेब बुराडे यांना जाहीर….
दि ११ _ संभाजीनगर येथील श्री दत्त दिगंबर पीठ संस्थान तर्फ दर वर्षी दत्त जयंती दिवशी सर्व समाजातील समाजिक कार्य करणाऱ्या समाज सेवकांचा मानाचा व प्रतिष्ठेचा धर्म भुषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो यंदाचा धर्मभुषण पुरस्कार.. भारतीय नरहरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष पंढरपूर चे समाजसेवक काकासाहेब सुमनबाबुराव बुराडे सोनार यांना जाहीर झाला आसून येत्या १४ तारखेला […]
प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ॲग्रिस्टॅक योजनेची माहिती पोहोचवावी -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
कृषी क्षेत्रातील डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यापर्यंत जलद गतीने पोहोचवण्यासाठी ॲग्रिस्टॅक योजना महत्त्वपूर्ण आहे. सोलापूर, दिनांक 11(जिमाका):- राज्यातील कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरीत्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरिता केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅक ही योजना राज्यात राबविण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने सोलापूर […]
पंढरपूर अर्बन बँकेच्या व्यवहारावर कोणताही परिणाम नाही- मुळे शाखा बारामती येथील प्रकार… अपहार, चोरीबाबत बँकेकडे विमा पॉलिसी कार्यरत
शाखा बारामती येथील प्रकार… अपहार, चोरीबाबत बँकेकडे विमा पॉलिसी कार्यरत पंढरपूर दि. 10- पंढरपूर अर्बन बँकेच्या बारामती शाखेमधील व्यवस्थापकाने केलेल्या नऊ कोटी अपहाराचा कोणताही परिणाम बँकेच्या व्यवहारावर होणार नसून खातेदारांची सर्व रक्कम सुरक्षित आहे. याबाबत बँकेची सर्व रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती बँकेचे चेअरमन सतीश मुळे यांनी दिली. पंढरपूर बँकेच्या बारामती शाखेचा व्यवस्थापक अमित प्रदीप […]
कर्मयोगी इंस्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे अंतर्गत आंतर महाविद्यालयीन रायफल व पिस्टल शूटिंग या विभागीय क्रीडास्पर्धे मध्ये श्री. पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय शेळवे पंढरपूर येथील विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादित केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नोलॉजीकल यूनिवर्सिटी लोणेरे व कर्मयोगी इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या स्पर्धेमध्ये रायफल शूटिंग […]
इंदापूरच्या निमगाव केतकी येथील महिला पदाधिकाऱ्याच्या मर्डर हत्येनंतर आरोपी पोलीस ठाण्यात हजर,इंदापूर तालुक्यात खळबळ
इंदापूरमध्ये चाकूने सपासप वार करून 33 वर्षांच्या महिलेची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.सुनिता यांच्यावर वार केल्यानंतर आरोपीने थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. सुनिता शेंडे या जानाई लक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा होत्या. तर सुनिता शेंडे यांचे पती दादासाहेब शेंडे हे समता परिषदेचे माजी जिल्हाध्यक्ष आहेत. सुनिता शेंडे यांच्या […]
पशुसंवर्धन विभागांतर्गत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
सोलापूर दिनांक 04 (जिमाका):- पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्यामार्फत सन 2024-2025 या आर्थिक वर्षामध्ये जिल्हा वार्षिक योजनेमधून वैयक्तीक लाभाच्या विविध योजना राबविण्यात येतात यासाठी पात्र लाभार्थीना 20 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज सादर करावेत असे, आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. एन. एल, नरळे यांनी केले आहे. जिल्हा वार्षिक योजनेतून दुभत्या जनावरांना खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम, […]
पंढरपूर विधानसभेसाठी 14 टेबलवर मतमोजणी मतमोजणीसाठी 215 कर्मचारी; 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे
* 25 फेऱ्यांतून मतमोजणी होणार पूर्ण पंढरपूर : पंढरपूर विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8.00 वाजता सुरू होणार आहे. यासाठी 14 टेबलवरुन 25 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. याकरीता प्रशासनाने आवश्यक ती तयारी पूर्ण केली आहे. मतमोजणीसाठी सुमारे 215 अधिकारी कर्मचारी तर सुरक्षेसाठी 137 पोलीस अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय […]











