नशेत महिलेशी अश्लील संभाषण करणं एका मुख्याध्यापकाला चांगलेच अंगलट आले आहे. मुख्याध्यापक समोर येताच महिलेचा संताप अनावर झाला आणि महिलेचा रुद्रावतार बघून बघणाऱ्यांच्या अंगावर काटा उभा राहीला. चंद्रपूर येथील मुल तालुक्यातील ही घटना आहे. धुलीवंदनाच्या दिवशी ही घटना घडली आहे. दारुच्या नशेत जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापकाने महिलेशी अश्लील भाषेत बोलला. त्यामुळे संतापलेल्या महिलेने […]
ताज्याघडामोडी
हळदीच्या दिवशी ‘नवरी’ प्रियकरासह पळाली, फिनेल पिऊन पोलिसात गेली, विदर्भात खळबळ
लग्नाच्या आदल्या दिवशी घरात हळदीचा समारंभ सुरु होता. मात्र याच वेळी नवरीने टोकाचं पाऊल उचललं. प्रियकरासोबत फिनेल पिऊन तिने थेट पोलीस स्टेशन गाठलं. आपलं वय अवघ्या १६ वर्षांचं असून आई-वडील माझ्या इच्छेविरुद्ध लग्न लावून देत आहेत, असं तिने पोलिसांना सांगितलं. बुलढाण्यात ही घटना घडल्याची माहिती आहे. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे लग्नाच्या एक दिवस आधी हळदीचा […]
देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 20 मोठ्या घोषणा
राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचा 2023-24 या वर्षाकरता अर्थसंकल्प सादर केला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा हा पहिला अर्थसंकल्प आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून मांडलेला पहिलाच अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पीय भाषणात देवेंद्र फडणवीस यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या. काय आहेत या घोषणा, जाणून घेऊया… देवेंद्र फडणवीस यांच्या बजेटमधील 20 मोठ्या […]
आई-मुलगी महिला दिनाच्या कार्यक्रमात गेल्या, मात्र घरी पोहोचल्याच नाहीत, वाटेतच….
आई आणि मुलगी दुचाकीने घरी जात असताना भरधाव कंटेनरने त्यांना धडक दिली. त्यात पंधरा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान आईचाही दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अकोला शहरातील नेहरू पार्क चौकात काल जागतिक महिला दिनाच्या रात्री म्हणजेच बुधवारी दहा वाजताच्या सुमारास घडली. संपदा तुपवणे […]
त्या महिलेचा नाद सोड, नाहीतर…; तरुणाला धमकी दिली अन् नंतर त्याचा मृतदेहच सापडला
आष्टा या ठिकाणी एका तरुणाचा गळा आवळून निर्घृण खून करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाजी आप्पा कुलाळ, वय वर्ष ३५,असे या तरुणाचं नाव असून अनैतिक संबंधतून हा खून करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. आष्टा शहरातल्या नागावर रस्त्यावर बुधवारी दुपारच्या सुमारास एका युवकाचा मृतदेह आढळून […]
बायकोने पोलिसांत तक्रार दिल्याचा राग अनावर, घरी येताच पतीनेच दिली भयंकर शिक्षा
पतीविरूद्ध पोलिसांत तक्रार देऊन परतताच पतीने हातोड्याने वार करून पत्नीची हत्या केली. ही थरारक घटना बुधवारी दुपारी कळमना स्टेशनअंतर्गत मिनीमातानगर येथे घडली. या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी मारेकरी पतीला अटक केली आहे. अमर भारद्वाज (वय ५०), असे अटकेतील पतीचे तर ललिता भारद्वाज (वय ४०), असे मृतकाचे नाव आहे. अमर याचा फळभाजी विक्रीचा व्यवसाय […]
भाजप कार्यकर्त्यावरील हल्ला: राष्ट्रवादीच्या आमदारासह पत्नीवरही गुन्हा दाखल
माजलगाव तालुक्यातील भाजप कार्यकर्ते अशोक शेजुळ यांच्यावर काल प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यात शेजुळ हे गंभीररित्या जखमी झाले. त्यानंतर त्यांच्यावर माजलगाव येथील प्राथमिक उपचार रुग्णालयात करून नंतर औरंगाबाद येथे हलवण्यात आले. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या सूतगिरणीत होत असलेल्या गैरप्रकाराविषयी तक्रार केली असल्यानेच माझ्यावर हल्ला झाला आहे, असा आरोप करत शेजुळ यांनी पोलीस […]
8 मुलांची आई, अनैतिक संबंध.. नंतर एका वयस्काचा खून, नंतर आरोपीला जे कळलं त्याने तोच हादरला
अनैतिक संबंधातून अनेकदा एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत मजल जाते. सागर पोलिसांनी अशाच एका खुनाचा उलगडा केला आहे. जसजसा या प्रकरणाचा उलगडा होत गेला तशा धक्कादायक बाबी समोर आल्या.सागर येथील एका गावात आठ मुलांच्या आईने आपल्या मोठ्या मुलासोबत एका व्यक्तीच्या हत्येचा कट रचला. पोलिसांनी महिला आणि तरुणाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्या तरुणाने ज्याची हत्या केली […]
कांद्याला भाव नाही, घरात खाणारी तोंड नऊ, २५ वर्षांच्या शेतकऱ्याने नको ते पाऊल उचललं
शेतात पिकवलेला कांद्याला योग्य भाव मिळाला नाही, त्यामुळे हातात पैसा देखील आला नाही, घरात नऊ जणांची खांद्यावर जबाबदारी, यातच लोकांकडून घेतलेले कर्ज फेडायचं कसं याची विवंचना, या कारणावरुनच बीडमधील युवा शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप होत आहे.संभाजी अर्जुन अष्टेकर असे टोकाचे पाऊल उचललेल्या २५ वर्षीय तरुणाचे नाव आहे. आज आपल्या शेतात गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याची […]
सरकारी अधिकाऱ्यावर हात उगारणं भोवलं, आमदार बच्चू कडू यांना 2 वर्षांची शिक्षा
प्रहार संघटनेचे नेते आणि राज्याचे माजी मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणी वाढल्या आहेत. बच्चू कडू यांना दोन वर्षाचा कारावास ठोठावण्यात आला आहे. नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. त्यामुळे बच्चू कडू हे तुरुंगात जाणार की उच्च न्यायालयात दाद मागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, कोर्टाच्या निकालामुळे बच्चू कडू यांची डोकेदुखी वाढली असून […]











