राज्यात उद्यापासून ( दि.१९ जून) ३० ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या […]
Uncategorized
भंडीशेगाव येथे सोलापुर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रमाच्या आयोजनाचा संकल्प
सोलापूर सोशल फाउंडेशनचे संस्थापक आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थिती भंडीशेगाव एक समृद्ध गाव विविध समाज उपयोगी कार्यक्रमासंदर्भात चर्चासत्र आज मंगळवार दिनांक १५ जून रोजी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणेश पाटील यांनी प्रास्ताविक केले. तर आ. सुभाष देशमुख यांनी मार्गर्शन केले. संस्थेचे सल्लागार उद्योजक अजित कंडरे यलमार यांनी सोलापूर सोशल […]
ओबीसी आरक्षण प्रश्नी आ.गोपीचंद पडळकर यांची पंढरपूर वडार समाजसमवेत बैठक ओबीसी आरक्षण,रॉयल्टी मुक्त गौण खनिज,आर्थिक विकास महामंडळ आदींबाबत चर्चा
ओबीसी आरक्षण प्रश्नी आ.गोपीचंद पडळकर यांची पंढरपूर वडार समाजसमवेत बैठक ओबीसी आरक्षण,रॉयल्टी मुक्त गौण खनिज,आर्थिक विकास महामंडळ आदींबाबत चर्चा ओबीसी आरक्षण प्रश्नी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज पंढरपुरात घेतलेल्या वडार समाज बांधवाच्या बैठकीत राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षण प्रश्नी आपली भूमिका मांडली व वंचीत घटकांना सत्तेत सहभागी होण्यासाठी हे आरक्षण कसे गरजेचे आहे हे पटवून दिले.यावेळी उपस्थित वडार […]
सोलापूर जिल्ह्यातील नवउद्योजकांना प्रोत्साहन आणि मार्गदर्शन करणार
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या बैठकीत निर्णय सोलापूर सोशल फाऊंडेशन संचालक समितीची नियोजित बैठक आज पार पडली. फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. सुभाषबापू देशमुख, संचालक अभिजित पाटील, रवींद्र मिनीयार, मयुरी वाघमारे, मुख्य समन्वयक विजय पाटील, विपुल लावंड, रोहिणी बिडवे, विजय कुचेकर, पल्लवी माने व अन्य सभासदांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न झाली. मागील मिटिंगचा आढावा घेत या सत्राचा प्रारंभ […]
व्होळे येथील अवैध वाळू उपशावर करकंब पोलिसांची कारवाई
भीमा नदीकाठी वाळू चोरांचा सुळसुळाट कायम असून गेल्या तीन महिन्याच्या कालावधीत पंढरपुर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचा अंतर्गत असलेल्या चारही पोलीस ठाण्याकडून अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी वारंवार कारवाया होत असताना देखील वाळू चोर मागे हटत नाहीत असेच वारंवार होणाऱ्या कारवायांतूनच दिसून येत आहे.पंढरपुर तालुक्यातील व्होळे येथे केलेल्या कारवाईत हिरव्या रंगाचा आरटीओ नंबर नसलेला ट्रक्टर डम्पिंग ट्रॉली व […]
कोतवाल आणि पोलीस पाटलाची सतर्कता,तावशी येथून होणाऱ्या अवैध वाळू उपशाचा पर्दाफाश
पंढरपुर तालुक्यातील भीमा व माण नदीच्या काठावरील विविध गावातून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर नियंत्रण मिळविण्यात पोलीस प्रशासनाच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे मोठ्या प्रमाणात यश आले आहे.गेल्या दोन महिन्यात पोटनिवणुकीचा बंदोबस्त आणि लॉकडाऊनच्या बंदोबस्ताची अतिरिक जबाबदारी पार पाडत असतानाच अवैध वाळू उपशावर सर्वाधिक कारवाया या पोलीस खात्याने केलेल्या आहेत.मात्र याच वेळी गौण खनिज रक्षणाची जबाबदारी असलेल्या महसूल खात्याकडून […]
प्रत्येक सामाजिक कार्यात प्राथमिक शिक्षकांचे योगदान मोलाचे- आ.प्रशांत परिचारक
समाजावर व देशावर ज्या-ज्यावेळी संकट आलं, त्या-त्यावेळी याच समाजातून मदत करणाऱ्या व्यक्ती पुढे आलेल्या आहेत, त्यातही अशा संकट प्रसंगीच नव्हे तर प्रत्येक सामाजिक कार्यात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांचे योगदान आजपर्यंत मोलाचे ठरत आले आहे. असे प्रतिपादन आमदार प्रशांतराव परिचारक यांनी केले. ते पंढरपूर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या वतीने देण्यात आलेल्या वैद्यकीय उपकरणांच्या प्रदान समारंभात […]
पुणे-सोलापूर महामार्गावर इर्टिगा-बोलेरोचा भीषण अपघात
इंदापूर शहराच्या लगत पुणे – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारी इर्टिगा कार आणि बोलेरो जीप यांचा भीषण अपघात झाला आहे.या अपघातात चार जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.सोमवारी तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झालेला असून, (एम एच 13 झेड 3901) महिंद्रा बोलेरो जीप, व मारुती इर्टिगा (क्रमांक एम एच 46 बीई 4515,) यांचा […]
शहरातील नागरिकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करा यासह विविध मागण्यासाठी मनसेचे निवेदन
टाळेबंदी नंतर नव्याने सर्व काही सुरू होत असताना. नागरिकांची घरपट्टी माफ करणे , फि माफी, आठवडे बाजार सुरू करणे, साखर कारखान्याची बिल अदा करणे अशा विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. या मागण्या पुर्ण न झाल्यास लवकरच आंदोलनाचा इशारा मनसेचे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी दिला. मनसेच्या वतीने आज विविध पदाधिकाऱ्यांसोबत […]
सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या ३ ऱ्या वर्धापन दिनानिमित्त निबंध लेखन व फोटोग्राफी स्पर्धा
सोलापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधणे हे ध्येय घेऊन सोलापूर सोशल फाऊंडेशन काम करत आहे हे आपण जाणताच. येत्या अक्षय्य तृतीयेला फाऊंडेशनच्या स्थापनेला ३ वर्षे पूर्ण होत आहेत. या दिवसाचे औचित्य साधून आम्ही एक अभिनव स्पर्धा आयोजित करत आहोत. ११ तालुक्यांनी बनलेला आपला सोलापूर जिल्हा म्हणजे धार्मिक, ऐतिहासिक, भौगोलिक, व्यावसायिक वैशिष्ट्यांची खाण आहे. पंढरपूरचा विठोबा किंवा […]











