गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

धक्कादायक! अधिकृत सेंटरमधूनच दिले जात होते बोगस आधारकार्ड

भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणून अनेक ओळखपत्रांपैकी एक असलेले आधारकार्ड अधिकृत सेंटरमधूनच बोगस दिले जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या पथकाने याप्रकरणी दोघांना अटक केली असून, नेपाळच्या नागरिकासह अनेकांना या दोघांनी बोगस कागदपत्रांवर आधारकार्ड बनवून दिल्याचे समोर आले आहे. बोरिवली पश्चिमेकडील कॅनरा बँकेत आधारकार्ड नोंदणीची सेवा पुरविणाऱ्या कंपनीने त्यांचे अधिकृत सेंटर सुरू केले आहे. बँकेचे […]

निविदा सूचना

पंढरपुरात भेसळयुक्त दूध घेऊन येणाऱ्या टेम्पोवर अन्न विभागाची कारवाई

०३/०२/२०२१ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी  प्रशांत कुचेकर यांना सांगली जिल्ह्यातून एक निळ्या रंगाचा आयशर टेम्पो क्रमानं एम एच ०९ सी यू ०००७ भेसळ केलेले दूध घेऊन पंढरपूर येथे येणार असल्याच्या प्राप्त गोपनीय माहिती नुसार मे. साबरकांथा को ऑप मिल्क प्रोड्युसर ली या पेढीची तपासणी केली. सदर पेढी गोपनीय माहितीनुसार सदर भेसळीचे दूध स्वीकारत असल्याचे दिसून […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

पोलीस शिपायाला १७ लाखांचा गंडा

मुंबई : स्वस्तात घर विकत घेण्याचे प्रलोभन दाखवून एका पोलीस शिपायाला १७ लाख रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. दिंडोशी येथील शिवशाही पुनर्वसन प्रकल्पांतर्गत उभारलेल्या इमारतीत दोन सदनिका प्रत्येकी दहा लाख रुपयांना खरेदी करण्याच्या मोहापोटी पैसे भरणाऱ्या या शिपायाला अशी कोणतीही इमारतच नसल्याचे समजल्यावर ही फसवणूक लक्षात आली. कुर्ला परिसरात वास्तव्यास असलेल्या आणि […]

ताज्याघडामोडी

सांगली जिल्हा बँकेतील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचे आदेश

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाने नोकरभरती करीत असताना गैरमार्गाचा अवलंब केला असल्याचा आरोप आहे. तसेच बँकेसाठी फर्निचर, मालमत्ता खरेदी करीत असतान अनियमितता आढळली तसेच ७० कोटींचे कर्ज माफ केले असल्याची तक्रार स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष एस. डी. फराटे यांनी सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांच्याकडे एका पत्राद्वारे केली होती. तसेच नाबार्डकडेही तक्रार करण्यात […]

गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

मुलांनीच आईला गंडवलं, लाखो रुपयांसह 150 तोळे सोने लंपास!

मुलगा, नातू आणि दोन सुनांनी मिळून वृध्देची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. या लोकांनी 168 तोळे सोने, 70 लाख रोकड परस्पर खात्यावरुन घेतल्याची तक्रार वृद्ध महिलेने केली. याप्रकरणी दोन सुना, नातू आणि नातवाच्या मित्राला अटक करण्यात आली आहे. स्वतःचा मुलगा, नातू आणि दोन सुनांनी बनावट कागदपत्रे तयार करुन 80 वर्षीय वृद्ध महिलेची कोट्यवधीची […]

ताज्याघडामोडी

मुंबईत मांत्रिकाने वृद्धेला घातला 40 लाखांचा गंडा

मुंबई, 21 जानेवारी : पैशांचा पाऊस पाडण्याकरता तांत्रिक मांत्रिक सारख्या अघोरी प्रथा आजही 21 व्या शकतात केल्या जातात. धक्कादायक म्हणजे मुंबई सारख्या जागतिक प्रगत शहरात असा प्रकार घडत आहे. मुंबईतील नागपाडा भागातून याप्रकरणी 2 मांत्रिकांना अटक करण्यात आली आहे. नागपाडा येथे एका 82 वर्षीय महिलेचा तांत्रिक मांत्रिक या अंधश्रद्धेवर खूप विश्वास होता. नातीच्या लग्नातील अडसर आणि […]