ताज्याघडामोडी

स्वेरीच्या ऋतुजा पाटील दुहेरी सुवर्ण पदकाने सन्मानित

पंढरपूर- स्वेरी अभियांत्रिकीत शैक्षणिक वर्ष २०१९-२० मध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग विभागामध्ये शिकत असलेल्या ऋतुजा नागेश पाटील यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून डॉ. बाबासाहेब बंडगर सुवर्णपदक’ व श्री निवृत्ती व्होनप्पा गायकवाड सुवर्णपदक ’ या दुहेरी सुवर्ण पदकाने गौरविण्यात आले आहे.

          पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामार्फत घेण्यात आलेल्या एप्रिल-मे २०२० या परीक्षेमध्ये सोलापूर विद्यापीठ संलग्नित सर्व महाविद्यालयातून स्वेरीच्या स्थापत्य (सिव्हील) अभियांत्रिकीच्या सर्व विषयांमधून सर्व प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केल्यामुळे माजी कुलगुरू डॉ. बाबासाहेब बंडगर पुरस्कृत असलेला डॉ. बाबासाहेब बंडगर सुवर्णपदक’ हा पुरस्कार ऋतुजा पाटील यांनी पटकावला. तसेच सर्व विषयांमध्ये सर्वाधिक सीजीपीए गुण घेऊन उत्तीर्ण झाल्याबद्दल श्री निवृत्ती व्होनप्पा गायकवाड पुरस्कृत असलेले श्री निवृत्ती व्होनप्पा गायकवाड सुवर्णपदक’ देखील  ऋतुजा पाटील यांनी मिळवले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आयोजित १६ व्या दीक्षांत सोहळा समारंभात महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल तथा कुलपती भगतसिंह कोश्यारी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत आमदार सुभाष देशमुख व कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणीस यांच्या हस्ते ही दोन सुवर्णपदके आणि प्रमाणपत्रे देऊन ऋतुजा पाटील यांना सन्मानित करण्यात आले. १९९८ साली गोपाळपूर (ता. पंढरपूर) मधील ओसाड माळरानावर संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे आणि त्यांच्या सहकारी अभियंत्यांनी एकत्र येऊन विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी म्हणून उच्च तंत्रशिक्षणाची सोय निर्माण करून दिली. आता मात्र ग्रामीण विद्यार्थ्यांबरोबरच शहरी व देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांचा कल स्वेरीकडे वाढतोय. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून शिवाजी विद्यापीठकोल्हापूर व पु.अ.हो. सोलापूर विद्यापीठाच्या शैक्षणिक निकालात स्वेरीचा विशेष दबदबा नेहमीच राहिलेला आहे. महाविद्यालयाच्या स्थापनेनंतर पहिल्याच बॅचची विद्यार्थिनी कु.रुपाली पवार हीने शिवाजी विद्यापीठात प्रथम येऊन सुवर्ण पदक मिळवले होते. कु. ऋतुजा नागेश पाटील यांना स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगेशैक्षणिक अधिष्ठाता व विभागप्रमुख डॉ. प्रशांत पवार व प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे विभागप्रमुख डॉ. सतीश लेंडवे व वर्ग शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. दुहेरी सुवर्णपदक’ मिळाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगेअध्यक्ष नामदेव कागदेउपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्तस्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज,स्वेरी अंतर्गत असलेल्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. मिथुन मणियारडिप्लोमा इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतीश मांडवेअधिष्ठाताविभागप्रमुखअभियांत्रिकी व फार्मसीचे सर्व प्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीपालक व विद्यार्थ्यांनी ऋतुजा पाटील यांचे अभिनंदन केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *