ताज्याघडामोडी

वाखरीत परिचारक गटाचे वर्चस्व , शिवसेना ठरणार निर्णायक

पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील वाखरी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत जि.प. सदस्य सविता निखिलगीर गोसावी यांच्या परिचारक-भालके गटाला ७ तर पांडुरंग कारखान्याचे संचालक गुलाब पोरे यांच्या परिचारक-भालके-काळे या महाविकास आघाडीने ८ जागा पटकावल्या असुन यापुर्वी शिवसेनेचे बिनविरोध झालेले दोन ऊमेदवार आपले मत कोणाच्या पारड्यात टाकणार यावर राजकीय गणित अवलंबुन असणार आहे. यापुर्वीच तीन जागा बिनविरोध झाल्याने १४ जागासाठी १५ जानेवारीला मतप्रक्रिया पार पडली.

वाखरी ग्रामपंचायत निवडणूकीतील विजयी ऊमेदवार पुढीलप्रमाणे – प्रभाग क्र ०१
सीमा योगेश पांढरे , बिनविरोध- संजय नारायण अभंगराव ,प्रभाग क्र ०२ -सोमनाथ शिवाजी पोरे ,बाळु विठ्ठल लेंगरे , बिनविरोध- ऊमाबाई विठ्ठल जगताप , प्रभाग क्र ०३ -ज्ञानेश्वरी संजय सरगर ,कविता तुकाराम पोरे,चंद्रकात दत्ताञय चव्हाण, प्रभाग क्र ०४-विक्रम रंगनाथ घोडके,धनश्री तानाजी साळुंखे,वैशाली सर्जेराव पांढरे, प्रभाग क्र ०५-भारत दत्ताञय लोखंडे,वर्षा युवराज पवार,संग्राम ज्ञानेश्वर गायकवाड ,प्रभाग क्र ०६ -छायादेवी एकनाथ लोखंडे,वैशाली जनार्दन काळे,दिपाली धनंजय पिसे.

काही ठिकाणी तिरंगी आणि चौरंगी लढत झाली असुन अपक्ष ऊमेदवारावर सर्वांचे लक्ष लागले होते. प्रभाग क्र ०३ मधे अटीतटीच्या लढतीत परिचारक गटाच्या महिला ऊमेदवारांनी बाजी मारली आहे. प्रभाग ५ मध्ये प्रतिष्ठेची केलेल्या जागेवर विद्यमान सदस्य संग्राम गायकवाड यांनी पुनश्च विजय मिळवला असुन प्रभाग २ मधुन सोमनाथ पोरे आणि बाळु लेंगरे यांचा निर्विवाद विजय मानला जात होता. काही ठिकाणी धक्कादायक तर काही ठिकाणी अपेक्षित निकाल लागला असुन शिवसेनेचे वाघ काय भुमिका घेतात यावर वाखरीकरांचे लक्ष लागले आहे. सर्व विजयी ऊमेदवारांचे ग्रामस्थामधुन अभिनंदन होत आहे.

प्रभाग क्र ६ मधुन होणार सरपंचाची निवड?

यापुर्वीच सर्वसाधारण पुरुष व महिला , नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला आणि अनुसूचित जातीमधील पुरुष यांनी सरपंचपद भुषवल्याने व नजीकचे आरक्षण जाहीर होण्याची शक्यता कमीच असल्याने ओबीसी पुरुष यासाठी सरपंचपद आरक्षित नसल्याचे समोर येत आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या दोन महिला ऊमेदवार प्रभाग क्र ६ मधुन निवडून आल्याने या दोहोपैकी एक महिला वाखरीची सरपंच होणार असल्याची चर्चा ग्रामस्थामधुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *