कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेज शेळवे येथे एडमिशन सेलचे उदघाटन”
(सुधाकरपंत परिचारक विद्यार्थी कल्याण योजनेचा विद्यार्थ्यांना लाभ)
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रथम व थेट व्दितीय वर्ष इंजिनिअरींग साठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व सोयींनी युक्त एडमिशन सेलचे उद्घाटन कर्मयोगी इंजिनिअरींग कॉलेजचे प्राचार्य डॉ.श्री.एस.पी.पाटील यांचे हस्ते मौजे शेळवे येथे करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सोशल डिस्टंसींग, सॅनिटायझर व मास्कचा वापर करुन सर्व नियमांची अंमलबजावणी करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन प्रवेशासंबंधी व कॉलेजची माहिती घेण्यासाठी कॉलेजला सर्व नियमांचे पालन करुन भेट द्यावी असे आवाहन प्राचार्य डॉ.श्री.एस.पी.पाटील यांनी केले. विद्यार्थी व पालक यांना कॉलेजला येण्यासाठी पंढरपुरहून वाहनाची सोय करण्यात आली आहे.
कोव्हीड-१९ मुळे सर्वजण आर्थिक अडचणींतून जात आहेत. त्यामुळे संस्थेमार्फत विद्यार्थ्यांसाठी ‘सुधाकरपंत परिचारक विद्यार्थी कल्याण योजना’ राबविण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना सवलतीचा लाभ मिळणार आहे, तरी विद्यार्थ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.प्रशांत परिचारक यांनी केले आहे.
शैक्षणिक गुणवत्तेसाठी व कॅम्पस प्लेसमेंटसाठी नावाजलेले पंचक्रोशीतील कॉलेज म्हणून “कर्मयोगी कॉलेजची” निवड पालक नेहमीच करतात असे उपप्राचार्य मुडेगावकर जे.एल. यांनी सांगितले.
या उद्घाटनप्रसंगीच्या कार्यक्रमात प्राध्यापक बाबर ए.टी., प्रा. शिवपुजे डी.बी., प्रा. एस.एम. कुलकर्णी , प्रा.आर. जे.पांचाळ व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन स्क्रुटीनी केंद्रप्रमुख प्रा.सावेकर एस.जे.यांनी केले व आभार प्रा.तिवारी एन.जी.यांनी मानले.
प्रवेशासाठी व ऑनलाईन प्रक्रियेसाठी प्रा.देशमाने ए.ए.-मो.नं.-९५५२२३५८५४ यांचेशी संपर्क करावा.
