ताज्याघडामोडी

डिसेंबर महिन्यात राष्ट्रीयकृत बँकाचे शटर १४ दिवस लॉकडाऊन 

डिसेंबर महिन्यात राष्ट्रीयकृत बँकाचे शटर १४ दिवस लॉकडाऊन 

राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे त्रस्त असलेले नागिरक आणखी संतप्त ?

        गेले आठ महिने सर्वसामान्य नागिरकांनी कोरोनाच्या नावाखाली लॉकडाऊनला सामोरे जावे लागल्यामुळे प्रचंड अडचणीत आलेली असतानाच दुसरीकडे अनलॉक प्रक्रिया सुरु होऊन देखील शासकीय कार्यालये असो अथवा सरकारी बँका या ठिकाणी कर्मचाऱ्यांची अनुपस्थतिती आणि अरेरावी यामुळे मोठा त्रास सहन करत आली आहे.अशातच वारंवार होणाऱ्या राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱ्याच्या संपाबद्दल देखील सामान्य लोकांमध्ये प्रचंड नाराजी असून शनिवार-रविवारच्या सुट्टीला जोडून संप करणे हा तर जणू प्रघातच पडला आहे. 
       आता डिसेंबर महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण  राज्युनुसार डिसेंबर २०२० मध्ये १४ दिवस बँका बंद राहणार आहेत.महिन्याच्या सुरवातीला म्हणजे ३ डिसेंबरला बँका बंद राहणार आहेत. ३ डिसेंबरला कनकदास जयंती आणि फेस्ट ऑफ सेंट फ्रान्सिस झेवियर असल्यामुळे बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. त्यानंतर ६ डिसेंबरला रविवार असल्यामुळे देशभरातील सर्वच बँकांना साप्ताहिक सुट्टी असणार आहे. 
यानंतर १२ डिसेंबरला दुसरा शनिवार आणि १३ डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँकांचे कामगाज बंद राहणार आहे. २० डिसेंबरला रविवार असल्यामुळे बँका बंद असणार आहेत. त्यानंतर २४ अणि २५ डिसेंबरला ख्रिसमस निमित्त बँकेचे कामकाज बंद राहणार आहे. 
      एकीकडे राज्यातील जनता अतिवृष्टी,पूर,वादळ यामुळे मोठा आर्थिक फटका सहन करत आपले आर्थिक व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे.कोरोनामुळे अडचणीत आलेले दुकानदार,छोटे मोठे स्वयंरोजगार करणारे अगदी रविवारची सुट्टी देखील न घेता अर्थकारण सावरण्याचा प्रयत्न करीत आहेत अशा वेळी राष्ट्रीयकृत बँकाच्या सुट्ट्यामुळे मोठी अडचण होणार आहे.सरकार हे बँक कर्मचारी संघटित असल्यामुळे त्यांच्यासमोर नांगी टाकते अशीच भावना सर्वसामान्य जनतेमध्ये असताना निदान पुढील सहा महिने तरी धार्मिक सण,जयंती,शनिवार आदी सुट्ट्या रद्द कराव्यात अशी अपेक्षा सामान्य जनतेकडून व्यक्त होताना दिसून येत आहे.  

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *