ताज्याघडामोडी

फडणवीस साहेब कुंभार घाट दुर्घटनेप्रकरणी विधानभवनात आवाज उठवा!- गणेश अंकुशराव

फडणवीस साहेब कुंभार घाट दुर्घटनेप्रकरणी विधानभवनात आवाज उठवा!- गणेश अंकुशराव

पंढरपूर (प्रतिनिधी):- ‘‘फडणवीस साहेब कुंभार घाट दुर्घटना घडून दीड महिना उलटून गेला तरी या दुर्घटनेस जबाबदार असलेले अद्याप उजळ माथ्याने फिरत आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई नाही, दुर्घटनेतील मयतांच्या वारसांनाही अद्याप न्याय मिळाला नाही… आत्ता तुम्हीच यात लक्ष घालुन याबद्दल विधानभवनात आवाज उठवा आणि आमच्या समाजबांधवांना न्याय द्या!’’ अशी विनंती आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केली असल्याची माहिती महर्षी वाल्मिकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. 

कुंभार घाटा लगतची भिंत कोसळून घडलेल्या दुर्घटनेत 6 जणांचा बळी जाऊन महिना-दीड महिना उलटून गेला तरी याला जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला अद्याप अटक झालेली नाही, शासनाने मयताच्या वारसांना जी मदत जाहीर केली त्याची संपुर्ण पुर्तता अद्याप झालेली नाही. सत्ताधारी आघाडीतील नेत्यांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे, किमान आता विरोधी पक्षातील नेते तरी याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा आहे.

या दुर्घटनेसाठी जबाबदार असलेल्या दोषी ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा, मोकाट फिरणारे जलसंपदा विभागाचे दोषी अधिकार्‍यांना अटक करावी, मृतांच्या वारसांना मंदिर समितीमध्ये नोकरीस घ्यावे, महापुरात वाहुन गेलेली त्यांची घरे पुन्हा नवीन ठिकाणी बांधुन द्यावीत,  या दुर्घटनेस कारणीभुत ठढरलेल्या बेजबाबदार व भ्रष्ट ठेकेदार व अधिकार्‍यांची तात्काळ चौकशी करुन दोषींवर कठोर कारवाई करावी, मयतांच्या वारसांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा. यासाठी आपण विरोधी पक्ष नेत्यांनी आमच्या पाठीशी रहावे. अशी विनंती श्री.फडणवीस यांचेकडे केली. ‘‘मी स्वत: याकडे जातीने लक्ष देईन आणि आपल्या समाजबांधवांना न्याय मिळवुन देईन.’’ असे आश्‍वासन श्री.फडणवीस यांनी दिले असल्याची माहितीही श्री.अंकुशराव यांनी दिली आहे.

यावेळी आमदार प्रशांतराव परिचारक, भाजपाचे अनेक नेते तसेच गणेश अंकुशराव, पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट, युवकनेते प्रणव परिचारक, होडी चालक मालक संघाचे सतीश नेहतराव, अनिल अभंगराव, मारुती संगीतराव, विक्रम शिरसट, राहुल परचंडे, बाबासाहेब अभंगराव, अरुण कांबळे, अप्पा करकमकर, सचिन अभंगराव, नितीन अभंगराव सुरज कांबळे, सुरज नेहतराव, निलेश संगीतराव, सोमनाथ अभंगराव, विनायक संगीतराव यांचेसह महादेव कोळी समाजाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.  

माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी फेसबुकद्वारे तात्काळ व्यक्त केल्या भावना!
पंढरपूर दौर्‍यावर आलेले माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आदिवासी महादेव कोळी समाजाच्या भावना लक्षात घेवुन तात्काळ आपल्या भावना फेसबुकवर व्यक्त करुन कुंभार घाट दुर्घटनेतील जबाबदार दोषी अधिकारी आणि ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी अशी आपली ठाम भुमिका असल्याचे संकेत दिले! आपल्या फेसबुक पोष्टद्वारे ते म्हणाले, ‘‘पंढरपूरमधील कुंभारघाट दुर्घटनेत भींत पडून बळी गेलेल्या कुटूंबियांची आज भेट घेऊन सांत्वन केले. या पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि या परिवाराला न्याय द्यावा.’’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *