ताज्याघडामोडी

२४ सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन

२४ सप्टेंबर रोजी कर्मवीर जयंतीच्या मुख्य कार्यक्रमाचे आयोजन

पंढरपूर- ‘रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय व यशवंत
विद्यालय पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रयत शिक्षण संस्थेचे
संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३३ व्या जयंती
समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून
कर्मवीर भाऊराव पाटील यांचे नातू सुप्रसिद्ध साहित्यिक व जनरल बॉडीचे
सदस्य प्रा. अजित अप्पासाहेब पाटील हे असणार आहेत. तर कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या मध्यविभागीय सल्लागार समितीचे
चेअरमन तथा महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख संजीव जयकुमार पाटील हे
असणार आहेत. सदर कार्यक्रम गुरुवार दि. २४ सप्टेंबर रोजी सकाळी ११:००
वाजता ऑनलाईन पद्धतीने संपन्न होणार असून युट्यूबच्या
https://youtu.be/MJDWOMzGjdU या लिंकचा वापर करून  सदर कार्यक्रमास रयत
प्रेमी, हितचिंतक, रयतचे पदाधिकारी, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर सेवक
आदींनी उपस्थिती राहावे. असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कुंडलिक
शिंदे, यशवंत विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय शेवाळे व सांस्कृतिक प्रमुख
डॉ. राजाराम राठोड यांनी केले आहे.’
        प्रत्येक वर्षी कर्मवीर जयंतीचा कार्यक्रम अतिशय धामधूम स्वरुपात साजरा
करण्यात येतो. पंढरपूर शहराच्या मुख्य रस्त्यावरून कर्मवीर भाऊराव पाटील
यांच्या प्रतिमेची  सजविलेल्या रथामधून झांजपथकाच्या नाद घोषात वाजत गाजत
मिरवणूक काढली जाते. सदर मिरवणुकीत महाविद्यालयाचे हजारो
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. मात्र या
वर्षी कोव्हीड१९ महामारीच्या प्रभावामुळे हा कार्यक्रम व्हिडीओ
कॉन्फरन्सीद्वारे होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *