ताज्याघडामोडी

आमदार श्री भारत भालके यांच्या प्रयत्नांना यश सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता,वीर पत्नी व माजी सैनिकांना विशेष सवलती मिळणार

आमदार श्री भारत भालके यांच्या प्रयत्नांना यश
सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता,वीर पत्नी व माजी सैनिकांना विशेष सवलती मिळणार

पंढरपूर दि.20 ः महाराष्ट्र राज्यातील सर्व महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत येथील सैन्य दलातील शहीद झालेल्या जवानांच्या वीर माता, वीर पत्नी व आजी-माजी सैनिकांना घरपट्टी मालमत्ता कर 100 टक्के माफी देण्याचा शासन निर्णय झालेला आहे.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी अनेक वेळा या विषयावर विधीमंडळामध्ये तारांकित प्रश्न मांडलेला होता. सदरचा प्रश्न कालच्या पावासाळी अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्न क्र.13916, दि.13.07.2020 दाखल करून न्याय मागितलेला होता. सदर तारांकित प्रश्नाला न्याय देणेसाठी शासनाने दि.9 सप्टेंबर, 2020 रोजी नगरविकास विभागाने तसा जी.आर. काढून मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नीला मालमत्ता कर माफी योजनेतून राज्यातील नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील माजी सैनिकांना मालमत्ता करातून सूट देण्यात आलेली आहे.
            आमदार श्री भारत भालके यांनी कायमच देशातील, राज्यातील सैनिकांचा आदर केलेला असून त्यांच्या कुटूंबातील व्यक्तींचाही तितकाच आदर करीत असतात. तसेच त्यांच्या वक्तव्यातून कायमच सैनिकांचा सन्मान केल्याचे दिसून येते. आपले सैनिक डोळ्यात तेल घालून रात्रं-दिवस सीमेवर रक्षण करीत असल्यामुळे आपण सुखाने राहु शकतो. आमदार          श्री भालके यांनी यापूर्वी अनेकदा सदर प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी अधिवेशनामध्ये विधान भवनामध्ये प्रयत्न केलेला आहे. परंतु विरोधी पक्षाचे सरकार असल्यामुळे याबाबत न्याय मिळालेला नव्हता, आता या आघाडी सरकारने या प्रश्नी न्याय देऊन कृतज्ञता व्यक्त करून तसा जी.आर.काढल्यामुळे आमदार श्री भारत भालके यांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून आभार व्यक्त केले आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *