माईंड ट्री प्रा. लिमिटेड ही एक भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान सेवा आणि सल्लागार कंपनी आहे. या कंपनीचे मुख्यालय बंगलोर येथे आहे. हा लार्सन अँड टुब्रो ग्रुपचा एक भाग आहे. १९९९ मध्ये स्थापन झालेल्या या कंपनीत ३८ हजार ५१८ कर्मचारी कार्यरत कार्यरत आहेत. अशा या कंपनीत पंढरपूर सिंहगड महाविद्यालयातील ८ विद्यार्थ्यांची कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी दिली.
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील सिव्हिल इंजिनिअरींग विभागातील राहुल रविकांत चव्हाण, मेकॅनिकल इंजिनिअरींग विभागातील समाधान किसन माळी, संदीप अशोक आदलिंगे, इलेक्ट्रीकल इंजिनिअरींग विभागातील निकीता नागेश सुर्यवंशी, ऋतुजा प्रफुल्ल देशमुख, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग विभागातील शांता दिलीप लोखंडे आणि काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागातील सुशांत हरिश्चंद्र बरजे, आदर्श खपाले आदी ८ विद्यार्थ्यांची कॅम्पस मुलाखतीतून निवड निवड झाली असुन निवड झालेल्या विद्यार्थ्यांना माईंड ट्री कंपनीकडून ४ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे.
पंढरपूर सिंहगड महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना “प्रकल्प धारितशिक्षण” शिक्षण दिले जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांची संशोधन वृत्ती समोर येते. संशोधन वृत्तीचा फायदा भविष्यात मुलांना करिअर साठी खुप मोठ्यात प्रमाणात होत असतो. देशातील व परदेशातील नामांकित उद्योगसमूहातील संस्थांसोबत सिंहगडचे अनेक सामाजिक सामंजस्य करार महाविद्यालयाने केलेला आहेत. महाविद्यालयातील विद्यार्थी प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असावा यासाठी पुरक उपक्रम घेण्यासाठी सिंहगड महाविद्यालय प्रयत्नशील असते. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक व बौद्धीक कौशल्याचा विकास होण्यासाठी असंख्य मुल्यवर्धित कार्यक्रमाचे आयोजन सिंहगड कॉलेज अनेक वर्षापासून करत आहे. यामुळेच महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी नामांकित कंपनीत निवडले जात आहेत.
“माईंड ट्री” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.