ताज्याघडामोडी

रेल्वे पुलाजवळून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

रेल्वे पुलाजवळून होणाऱ्या अवैध वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांची कारवाई 

पंढरपूर शहरानजीक असलेल्या चंद्रभागा नदीच्या रेल्वे पुलानजीकच्या पात्रातून अवैधरित्या करण्यात येत असलेल्या वाळू उपशावर पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई केली असून या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात करण्यात आला आहे.
     या बाबत पो.ना.संदीप पाटील यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.सागर कवडे यांनी दिलेल्या सुचनेनुसार व आदेशानुसार फिर्यादी पोलीस नाईक संदीप पाटील यांच्यासह पो.हे.काँ. उबाऴे,पो.ना.पवार,पो.ना. पठाण हे रेल्वे पुलाजवऴ भिमानदीचे पाञात गेले असता तेथे दोन इसम वाऴु काढत होते त्यावेऴी त्यांना वाऴु उपसा करण्याचा शासकीय परवाना आहे अगर कसे असे विचारले असता त्यांनी तो नसल्याचे सांगताच त्यांना जागीच ताब्यात घेतले ती वेऴ 15/00वा ची होती.त्या इसमास नाव पत्ता विचारता त्यांनी आपली नावे 1)प्रतापसिंह भिमसिंग परदेशी वय 49वर्ष रा जुनी पेठ पंढरपुर ता पंढरपुर 2)सुनिल उत्तम परचंडे वय 26वर्ष रा हरीदास वेस गल्ली पंढरपुर ता पंढरपुर असे असल्याचे सांगितले त्यांचे ताब्यात खालील वर्णनाचे वाऴु मिऴुन आले ती खालीलप्रमाणे.1)6,000/-रु. ठिक्यामध्ये भरलेली एक ब्रास वाळू कि.अं. —– 6,000/- रु मिळून आल्याने दोघांविरुध्द भा.दं.वि.कलम 379,34व गौण खनिज कायदा कलम 4(1)4( क)(1)21प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *