गुन्हे विश्व

नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 839 जणांवर दंडात्मक कारवाई, 1 लाख 86 हजारचा 900 दंड वसुल

नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 839 जणांवर दंडात्मक कारवाई

1 लाख 86 हजारचा 900 दंड वसूल – उपविभागीय पोलीस अधिकारी :  कवडे

 

                पंढरपूर दि.13:- पंढरपूर तालुक्यात शहरासह कोरोना  बाधित रुग्णांच्या संख्या  दिवसेंदिवस वाढत आहे.  कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी  शहरात दि.7 ऑगस्ट पासून  संचार बंदी  घोषीत  केली आहे. संचारबंदी सूरु असूनही त्यांची अंमलबजावणी न करणाऱ्या 839 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून  विविध कारवाईत 1 लाख 86 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी  सागर कवडे यांनी दिली आहे.

                कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजन करण्यात आल्या  आहेत. संचारबंदीच्या पहिल्याच दिवसांपासून शहरात  कडक अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. शहरात संचारबंदी कालावधीत दूध, हॉस्पिटल व मेडीकल या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. पोलीस प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते. तरीही नागरिक विनाकारण घराबाहे पडत आहेत. या नियमांचे उल्लघंन करणाऱ्या 839 जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली  असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी कवडे यांनी सांगितले.

            शहरात  संचारबंदीच्या     कालावधीत 7 ते 13 ऑगस्ट या कालावधीत मास्क न वापरणे, दुचाकीवरुन तीघांनी प्रवास करणे, चार चाकी वाहनांत तीन पेक्षा अधिक व्यक्तींनी प्रवास करणे, ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा अधिक वेळ दुकान उघडे ठेवणे, दुकानात एकाच वेळी पाच पेक्षा अधिक व्यक्ती असणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे,   सोशल डिस्टसिंगचे पालन न करणे  आदी कारवाईत  839 जणांवर कारवाई करण्यात आली असून  त्यांच्या कडून  1 लाख 86 हजार 900 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे डॉ.कवडे यांनी सांगितले.

     संचारबंदीच्या कालावधीत नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. कोणीही विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंध कायद्यांतर्गत कडक कारवाई  करण्यात येईल, असे आवाहनही डॉ.कवडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *