ताज्याघडामोडी

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर” या प्रशाले मध्ये “जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कर्मयोगी विद्यानिकेतन पंढरपूर या प्रशाले मध्ये जागतिक योग दिन उत्साहात साजरा

दिनांक २१ जून २०२० हा जगभरामध्ये योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो या योगदिनाच्या अनुषंगाने श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी विद्यानिकेतन, पंढरपूर या प्रशालेमध्ये “जागतिक योग दिवस” हा शासनाच्या सर्व नियमांचे पालन करत तसेच सोशल डिस्ट्न्सिंगमध्ये राहून मोजक्याच विद्यार्थ्यासह हा योग दिवस सकाळी ७.०० वा.उत्साहात साजरा करण्यात आला.

          यावेळी प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर म्हणाल्या की योगामुळे बुद्धी तल्लख होते व आपण कायम ताजे-तवाणे रहातो व पुर्ण शरिरास लवचिकता प्राप्त होते आणि भूक चांगली लागते तसेच श्वसन क्रीया चांगली होते, शरिरातील प्रत्येक इंद्रीय चांगले काम करते. विद्यार्थ्यांचे शरीर निरोगी राखण्यासाठी तसेच धावत्या जीवनशैलीतील तणाव कमी करण्यासाठी व शरिरातील रक्तप्रवाह सुरळीत करीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी योगाचे महत्व हे अनन्यसाधारण आहे म्हणुन योगा हा नित्यनियमाणे करणे गरजेचे आहे,

          यावेळी प्रशालेच्या प्राचार्या सौ शैला कर्णेकर, रजिस्ट्रार श्री गणेश वाळके, श्री राजेंद्र सावंत, क्रीडाशिक्षक श्री राहुल काळे, श्री महेश गावडे तसेच केसीएफ-कमांडो फोर्सच्या मुली उपस्थित होत्या.

या कार्यक्रमासाठी प्रशालेचे संस्थापक मा. आमदार श्री प्रशांतराव परिचारक यांनी उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *