ताज्याघडामोडी

गोसावी वाईन शेजारील बोळात पुन्हा एकदा अवैध विदेशी दारू विक्रीचा प्रकार उघडकीस

गोसावी वाईन शेजारील बोळात पुन्हा एकदा अवैध विदेशी दारू विक्रीचा प्रकार उघडकीस

पंढरपूर शहर पोलिसांची चार दिवसातील दुसरी कारवाई 

उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्त

पंढरपूर शहर व तालुक्यातील अनेक हॉटेल,रत्यावरील खाद्य पदार्थ विक्रेत्यांचे गाडे ही दारू पिण्याचे ठिकाणे बनली असून अशा ठिकाणी उघडयावर व वदर्ळच्या वेळी देखील बिनधास्तपणे मद्यप्राशन केली जात असल्याने तीर्थंक्षेत्र पंढरपुरची प्रतिमा मलीन होत असल्याचे दिसून येते. येथे येणारे भाविक या बाबत अनेकदा उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसून येतात. शहरातील वाईन शॉप मधून दारू पिण्याच्या कुठल्याही परवान्याची पडताळणी न करताच देशी-विदेशी  दारू विक्री  होत असल्याचे निदर्शनास येत असून सदर वाईन शॉपच्या ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केल्यास अगदी धाबे चालक व अवैधरित्या दारू विक्री करणाऱ्यांना बॉक्स भरभरून दारूच्या बॉटल्स दिल्या जात असल्याचे आढळून येईल. मात्र या बाबत तपासणी करण्याची जबाबदारी असलेला उत्पादन शुल्क विभाग मात्र सुस्त असून ड्राय डे दिवशीही अनेक ढाब्याच्या ठिकाणी दारू विक्री केली जाते तर अनेक ढाब्यावर येथे दारू पिण्यास मनाई असल्याचे फलक लावलेले असतात या फलकाच्या खाली बसूनच बिनधास्तपणे दारू पिली जाते. 
       महाराष्ट्र दारू बंदी अधिनियम १९६५ च्या कलम ई नुसार दारू विक्री व प्रतीबंध याबाबत अनेक कठोर कायदे आहेत मात्र या बाबत कारवाई करण्याची जबाबदारी असतानाही उत्पादन शुल्क विभाग कुठलीही कारवाई करताना दिसून येत नाही. 
      रंग पंचमी दिवशी जिल्हा दंडाधिकाऱ्यानी ड्राय डे घोषित केला होता मात्र याच काळात गोसावी वाईन शॉपच्या परिसरात अवैधरित्या दारू विक्री केली जात असल्याचे आढळून आल्यानंतर पंढरपूर शहर पोलिसांनी कारवाई करीत एका इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. आता चार दिवसाच्या फरकाने पुन्हा असाच प्रकार शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आला असून पो.कॉ.वसंत कांबळे, पो ना.पाटील, पो. काँ. माने  यांनी पंढरपूर शहर पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत 750/- रु. त्यात मँकडाँल नंबर 1विस्की कंपनीच्या 180मिलीच्या सिलबंद 05बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत 150रु. ,530/-रु. डाँक्टर ब्रँन्डी कंपनीच्या 180मिलीच्या सिलबंद 05 बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत106रु,650/-रु. त्यात मँकडाँल नंबर 1रम कंपनीच्या 180मिलीच्या सिलबंद 05बाटल्या प्रत्येकी बाटलीची किंमत 130रु. असा मुद्देमाल ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हेकामी जप्त करण्यात आलेल्या दारूच्या बाटल्या कुठून विक्रीस ठोक स्वरूपात उपलब्ध करण्यात आल्या होत्या याची चौकशी उत्पादन शुल्क विभाग करणार का व सदर विक्रेत्यांवर कारवाई करणार का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *