ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगडच्या रिया अंत्रोळीकर हिची फॉर्व्हिया या कंपनीमध्ये निवड

वार्षिक ५.५ लाख पॅकेजची नोकरी

पंढरपूर: प्रतिनिधी
कोर्टी (ता.पंढरपूर) येथील एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मधील मेकॅनिकल इंजिनियरींग विभागात चतुर्थ वर्षात शिक्षण घेत असलेली जुळे सोलापूर येथील कु. रिया मंदार अंत्रोळीकर हिची फॉर्व्हिीया या कंपनीत कॅम्पस प्लेसमेंट मधुन निवड झाली असल्याची माहिती मेकॅनिकल विभाागाचे विभाग प्रमुख डॉ. शाम कुलकर्णी यांनी दिली.
फॉर्व्हिया ही जगातील अग्रगण्य वाहन तंत्रज्ञान कंपन्यांपैकी एक असून २०२२ मध्ये फॉरेसिया आणि हेला या दोन नामांकित कंपन्यांच्या एकत्रीकरणातून तिची स्थापना झाली. कंपनी सुरक्षित, स्मार्ट, पर्यावरणपूरक आणि शाश्वत वाहतूक व्यवस्थेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करते.
फॉर्व्हिया वाहनांच्या आसन व्यवस्था, अंतर्गत सजावट प्रणाली, प्रकाश व्यवस्था, वाहन इलेक्ट्रॉनिक्स, स्वच्छ गतिशीलता तंत्रज्ञान, विद्युत वाहन उपाययोजना तसेच प्रगत चालक सहाय्य प्रणाली यांसारख्या क्षेत्रांत कार्यरत आहे. कंपनीचे तंत्रज्ञान जगभरातील प्रत्येक दोन वाहनांपैकी एका वाहनात वापरले जाते.
सुमारे १.३७ लाखांहून अधिक कर्मचारी, ८० पेक्षा अधिक जागतिक वाहन उत्पादक ग्राहक आणि अनेक संशोधन व विकास केंद्रांच्या बळावर फॉर्व्हिया जागतिक वाहन उद्योगाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान देत आहे. शाश्वत विकास, नवोन्मेष आणि तांत्रिक उत्कृष्टता ही कंपनीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिक्स, संगणक विज्ञान, विद्युत आणि यांत्रिकी शाखांतील विद्यार्थ्यांसाठी फॉर्व्हिया ही उत्कृष्ट करिअर संधी उपलब्ध करून देणारी बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून ओळखली जाते. उद्योगाभिमुख कौशल्ये, संशोधनवृत्ती आणि नवकल्पनांना प्रोत्साहन देणारी कार्यसंस्कृती हे कंपनीचे विशेष वैशिष्ट्य आहे.
अशा या कंपनीत रियाची कॅम्पस मुलाखतीतून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये, डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत पवार, डॉ. सत्यवान जगदाळे, प्रा. अतुल कुलकर्णी आदींसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *