ताज्याघडामोडी

संभाजी शिंदे यांची रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समिती सदस्यपदी निवड

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य संभाजी हिरालाल शिंदे यांची आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था अशी ओळख असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या मध्य विभाग सातारा विभागीय समन्वय समिती सदस्य पदी निवड करण्यात आली आहे.
या निवडीचे पत्र रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख यांच्याकडून संभाजी शिंदे यांना प्रदान करण्यात आले.
मागील 40 वर्षाच्या सामाजिक जीवनात शिवसेनेचे निष्ठावंत म्हणून जशी संभाजी शिंदे यांची ओळख आहे तसेच विविध सामाजिक कार्यात वेळोवेळी अनेकांच्या मदतीला धावून जात, तसेच सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नासाठी पाठपुरावा करीत संभाजी शिंदे यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. पक्ष संघटनेचे काम करीत असताना सर्वच पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते व सर्वसामान्य जनतेशी जिव्हाळ्याचे संबंध जोपासत आले आहेत. आणि यातूनच आता रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय समन्वय समिती सदस्य पदी निवड झाल्यानंतर संभाजी शिंदे यांच्या अभिनंदन केले जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *