ताज्याघडामोडी

स्वेरीत ‘ऑलम्पस २ के २५’ तांत्रिक स्पर्धेच्या पोस्टरचे उदघाटन

स्वेरीत राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा ऑलम्पस २ के २५’ १५ व १६ सप्टेंबरला होणार

पंढरपूर – स्वेरीमध्ये सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना आपली सुप्त प्रतिभा आणि कौशल्ये प्रदर्शित करण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध होत असते. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेला चालना मिळून तांत्रिक बाबींच्या सखोल अभ्यासाची वृत्ती अधिक दृढ होत आहे. या उपक्रमांच्या यशस्वी परंपरेचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांच्या विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणारी ऑलम्पस २ के २५’ ही राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा येत्या १५ व १६ सप्टेंबर रोजी स्वेरी मध्ये आयोजित करण्यात आली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधून नुकतेच या तंत्रस्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन प्रमुख पाहुणे व महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) मुंबईचे माजी संचालक डॉ. प्रकाश खोडके यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

         गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचालित अभियांत्रिकी महाविद्यालयात दि. १५ व दि. १६ सप्टेंबर रोजी आयोजिलेल्या ऑलम्पस २ के २५’ या  राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धेत इग्नाईटमेकस्पेल बीथिंक-बझ टॉकआर्डुइनो चॅलेंजब्रिज मेकिंगसॉईल आर्टमिरर कोडजस्ट अ मिनिट टायपिंगई-क्विझइलेक्ट्रिकल मास्टरबिझविझटेक क्विझिझकॉम्पोनंट्स क्लॅशकॅड क्लॅशटेक शार्क्सकॅम्पस ड्राईव्हमिनी-हॅकाथॉनएस्केप रूमकॅड रेससिव्हिल-टेक्नो क्विझइलेक्ट्रो एक्स्टेम्पोरपोस्टर प्रेझेंटेशनडिस्कसाथॉन असे जवळपास २३ तांत्रिक इव्हेंटस् असून यासाठी विजेत्यांना जवळपास एक लाखांपर्यंतची रोख रक्कमस्मृतिचिन्ह व प्रमाणपत्रे ही बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. या तांत्रिक स्पर्धेत अभियांत्रिकी तसेच पदविका अभियांत्रिकीचे विद्यार्थी सहभाग घेऊ शकतात. यासाठी संस्थेचे संस्थापक व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगेसंस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगे  व उपप्राचार्या डॉ. मीनाक्षी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अधिष्ठाता डॉ.महेश मठपतीसंशोधन अधिष्ठाता डॉ.अमरजित केनेसमन्वयक प्रा. डी.टी. काशीद यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांच्या वतीने ऑलम्पस २ के २५ चे विद्यार्थी अध्यक्ष अवधूत भोसलेउपाध्यक्ष गणेश सुरवसेसचिव गिरीजादेवी देशमुखसंयुक्त सचिव पीयूष चोपडे व जय गाडेकरखजिनदार उदयराज आवाड आणि सहखजिनदार सुहानी शिंदे यांच्यासह सर्व विभागप्रमुखप्राध्यापकवर्ग व विद्यार्थी परिश्रम घेत आहेत. ऑलम्पस २ के २५’ च्या निमित्ताने अभियांत्रिकीच्या सर्व विभागात जय्यत तयारी केली जात असल्याचे चित्र दिसत आहे. ऑलम्पस २ के २५’ या स्पर्धात्मक कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ऑलम्पस चे समन्वयक प्रा.डी.टी. काशीद (मोबा. ८२०८७२४२६६)डॉ. डी. डी. रोंगे (मोबा.९८९०६९५९५७)प्रा. के. आय. चौहान (मोबा. ९५८८६४१५९०)प्रा. एस. एस. गावडे (मोबा. ९४२०७ ६३८५०प्रा. पी. एच. गुंड (मोबा.८७९३०४३०८३)प्रा. एस. बी.खडके (मोबा. ८३८००५०६२२)प्रा. के. पी. कोंडुभैरी (मोबा. ८६३७७९६६९३)प्रा. ओ. व्ही. मंगले (मोबा.८२०८८९१००१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी केले आहे. यावेळी संस्थेचे संस्थापक व  कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग चे प्राचार्य डॉ. बी. पी. रोंगेसंस्थेचे सचिव डॉ. सुरज रोंगेसंस्थेचे माजी अध्यक्ष व विश्वस्त दादासाहेब रोंगेसंस्थेचे विश्वस्त एच. एम. बागलस्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज डॉ. एम. एम. पवारसंस्थेअंतर्गत असलेल्या डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळबी. फार्मसीचे प्राचार्य डॉ.एम.जी. मणियारडी. फार्मसीचे प्राचार्य प्रा.एस. व्ही. मांडवेअभियांत्रिकीच्या उपप्राचार्या डॉ. मिनाक्षी पवारसर्व अधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापक वर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी प्रतिनिधी गिरीजादेवी देशमुखसुहानी शिंदेनेहा जिरपेपीयूष चोपडेगणेश सुरवसेविद्यार्थी व पालक  यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *