ताज्याघडामोडी

कर्मयोगी इन्स्टिटयूट मध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा. योगविद्याधामचे प्राचार्य अशोक ननवरे यांचे योगाच्या प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन.

श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचालित कर्मयोगी इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजी, शेळवे येथे दि २१ जून रोजी जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी योग शिक्षक अशोक ननवरे यांनी दैनंदिन जीवनामध्ये असणारे योगा चे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देऊन विविध योगासने प्रात्यशिकासहित करून दाखविली. महाविद्यालयाच्या शारीरिक शिक्षण व राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन कण्यात आले होते.
यावेळी बोलताना अशोक ननवरे म्हणाले योगाचे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत, ज्यामध्ये शरीराची लवचिकता, सामर्थ्य, संतुलन आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्याचा यामध्ये समावेश आहे. तसेच चिंता आणि नैराश्य कमी करणे आणि निद्रा सुधारणा करण्यासाठी योग महत्वाची भूमिका बजावतात. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग हा आहे असे सांगून योगाचे महत्व विषद केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील म्हणाले की भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आज च्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदरुस्त ठेवू शकतो; शिवाय मनावरही चांगले संस्कार करू शकतो असे सांगून त्यांनी जीवनामधील योगाचे महत्व सांगितले.
श्री पांडुरंग प्रतिष्ठान चे चेअरमन श्री. रोहन परिचारक यांनी जागतिक योग दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस पी पाटील, कर्मयोगी पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ ए बी कणसे, रजीस्ट्रार श्री. जी डी वाळके, उप प्राचार्य प्रा. जे एल मुडेगावकर, संशोधन अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात, शैक्षणिक अधिष्ठाता प्रा. राहुल पांचाळ, विभागप्रमुख प्रा. डॉ. एस एम लंबे, डॉ. एस व्ही एकलारकर, प्रा. अनिल बाबर, प्रा. दीपक भोसले, तसेच सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विभाग प्रमुख प्रा.गणेश बागल यांनी या कार्यक्रमाचे संयोजक म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *