पुणे जिल्ह्यातील कुख्यात गुंड गजानन मारणे यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखलअसून काही दिवसांपासून तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर जंगी मिरवणूक काढली होती. कुख्यात गुंड गजानन मारणेची 2 जणांच्या खून खटल्यातून मुक्तता झाल्यानंतर त्याच्यावर आणखी खटले नसल्याने मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका करण्यात आली. त्याचे स्वागत करण्यासाठी कारागृहाबाहेर त्याचे हजारो समर्थक उपस्थित होते. त्यांनी ‘महाराष्ट्राचा किंग असे स्टेटस’ टाकत त्यांची एक्स्प्रेस हायवेवरुन जंगी मिरवणूक काढली. त्यात 300 हून अधिक चारचाकी गाड्या सहभागी होत्या. पप्पू गावडे आणि अमोल बधे खून प्रकरणात 2014 मध्ये गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर मोक्का अंतर्गत कारवाई झाली होती. तेव्हापासून मारणे हा तुरुंगात होता. त्याला सुरुवातीला येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यानंतर त्याला कोल्हापूरला हलवण्यात आले. सध्या तळोजा कारागृहात ठेवण्यात आले आहे.
तर याच गजानन मारणे याच्या पत्नीस आज राष्ट्रवादी कॉग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला असून राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या उपस्थितीत जयश्री मारणे यांनी प्रवेश केला आहे.या प्रवेशाची वार्ता पुणे परिसरात पसरताच मोठी चर्चा होताना दिसून येत आहे.