ताज्याघडामोडी

टाटा स्टर्लिंग मोटरच्या कर्मचाऱ्यांना स्वेरीच्या एमबीए विभागातील प्राध्यापकांकडून मार्गदर्शन ‘मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम’ अंतर्गत कार्यशाळा संपन्न

पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या एमबीए विभागातर्फे दि. २४ जून ते २९ जून २०२४ दरम्यान आठवडाभर पंढरपूर मधील केबीपी चौक येथे असणाऱ्या टाटा स्टर्लिंग मोटर’ कंपनीच्या ब्रँच मधील कर्मचाऱ्यांसाठी मॅनेजमेंट डेव्हलपमेंट प्रोग्राम (एमडीपी) कार्यशाळा आयोजित केली होती. कामे तर सर्वच जण  करतात पण स्मार्ट वर्क करण्यासाठी तेथील कर्मचाऱ्यांना स्वेरीच्या एमबीए विभागातील प्राध्यापकांकडून विशेष मार्गदर्शन करण्यात आले. 

टीम बिल्डिंग आणि लीडरशिप’ हा या  कार्यशाळेचा मुख्य विषय होता. याद्वारे कर्मचाऱ्यांना टीम तयार करण्यासाठी विशेष तंत्रांची माहिती देण्यात आली तसेच नेतृत्व कौशल्यांचे प्रशिक्षणही  यावेळी देण्यात आले. कार्यशाळेत कर्मचाऱ्यांनी प्रभावी टीमवर्कसमस्या सोडवणेआणि परिणामकारक निर्णय घेण्याच्या तंत्रांचा सखोल अभ्यास केला. यामध्ये प्रा.सागर सरिक यांनी टीम बिल्डिंग‘ संबंधित सत्रात विश्वास निर्माण करणेखुला संवाद साधणेएकमेकांच्या गुणांची ओळख करणे आणि एकत्रितपणे काम करण्याची वृत्ती विकसित करण्यावर विशेष भर दिला तर नेतृत्व तथा लीडरशिपच्या सत्रांमध्ये प्रा. प्रवीण मोरे यांनी नेतृत्वाच्या विविध शैलीनेतृत्वाच्या स्थित्यंतरांचे व्यवस्थापनआणि कर्मचाऱ्यांना प्रेरीत करण्याच्या पद्धतींची माहिती दिली. या कार्यशाळेच्या माध्यमातून टाटा स्टर्लिंग मोटरच्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापन कौशल्याबाबत विशेष माहिती देण्यात आली. त्यामुळे कर्मचारी आपल्या कार्यक्षेत्रात अधिक प्रभावीपणे काम करू शकतील आणि कंपनीच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी अधिकाधिक योगदान देऊ शकतील. ही कार्यशाळा आयोजित करण्यासाठी टाटा स्टर्लिंग मोटरचे विशाल शेळकेमहेंद्र मेटकरी आणि शौकत सय्यद यांनी महत्वपूर्ण सहकार्य केले. स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांच्या दिशादर्शक मार्गदर्शनाखाली एमबीए विभागाचे विभागप्रमुख डॉ. कमल गलानीप्रवेश प्रक्रिया अधिष्ठाता प्रा.करण पाटीलप्रा.मिनल भोरेडॉ. नागेश मगर आणि प्रा. सागर सरिक यांनी सहकार्य केले. या कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. अमाद अहमद यांनी केले तर प्रा.कोमल कोंडूभैरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *