Uncategorized

स्वेरीच्या प्रा.दिग्विजय रोंगे यांचा ‘बेगेल हाऊस’च्या ‘जर्नल ऑफ हीट ट्रान्सफर’ मध्ये शोधनिबंध प्रकाशित

पंढरपूर – स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे प्रा.दिग्विजय दादासाहेब रोंगे यांनी नुकताच बेगेल हाऊस’ च्या जर्नल ऑफ हीट ट्रान्सफर‘ मध्ये आपला शोधनिबंध प्रकाशित केला आहे.

           स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व  मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ. एस.बी. भोसले यांच्या नेतृत्वाखाली प्रा.दिग्विजय दादासाहेब रोंगे यांचा  ऑप्टिमाइझेशन ऑफ मायक्रो हीट सिंक विथ रिपीटेटिव्ह पॅटर्न ऑफ ऑब्स्टॅकल्स फॉर इलेक्ट्रॉनिक कूलिंग अँप्लिकेशन्स‘ हे शीर्षक असलेला शोधनिबंध नुकताच बेगेल हाऊस’ च्या जर्नल ऑफ हीट ट्रान्सफर‘ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. प्रा.दिग्विजय दादासाहेब रोंगे यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूरच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंग विभागातील डॉ. पी.एम. पवार यांनी या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले आहे तसेच त्यांना प्रा. एस.आर.गवळी यांचे देखील बहुमोल सहकार्य लाभले. मायक्रो हीट सिंक (एमएचएस) त्यांच्या उच्च उष्णता प्रवाह निर्माण करणारे लहान घटक थंड करण्याच्या क्षमतेमुळे आजकाल मायक्रो इलेक्ट्रॉनिक्सचा अविभाज्य भाग बनत आहेत. या शोधनिबंधात१०० वॅट / स्क्वेअर सें.मी. उच्च उष्णतेचा प्रवाह असलेली इलेक्ट्रॉनिक चिप एमएचएस उपकरणाच्या मदतीने थंड केली जाते. ज्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे ऑब्स्टॅकल्स’ हे पाण्याच्या प्रवाहात ठेवले जातात. जेणेकरून मायक्रो हीट सिंक’ ची उष्णता वाहून न्यायची क्षमता वाढते. प्रा.दिग्विजय रोंगे यांनी कॉम्प्यूटेशनल फ्लुइड डायनॅमिकस आणि जेनेटिक अल्गोरिथम’ या पद्धतींचा वापर करून सर्वोत्तम अशा ऑब्स्टॅकल पॅटर्न’ ची निवड केली जेणेकरून कमीत कमी थर्मल रेसिस्टन्स अँड पंपिंग पॉवर’ ची गरज असेल. हे संशोधन कार्य मायक्रोइलेक्ट्रॉनिक उपकरणांमध्ये योग्य तापमान राखण्यास मदत करेल. अशा स्वरुपाची सविस्तर माहिती असलेला शोधनिबंध बेगेल हाऊस’ च्या जर्नल ऑफ हीट ट्रान्सफर‘ मध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. बेगेल हाऊस’ हे वैद्यकीयवैज्ञानिक जर्नल्स आणि पुस्तकांचे शैक्षणिक प्रकाशक आहे ज्यात अभियांत्रिकी आणि जैववैद्यकीय विज्ञानांवर लक्ष केंद्रित केले जाते. प्रकाशक बेगेल डिजिटल लायब्ररी’ आणि थर्मोपीडिया’ द्वारे ई-पुस्तके आणि डिजिटल लेख देखील तयार करत असतात. त्याची स्थापना १९९१ मध्ये विल्यम बेगेल यांनी केली होती. त्यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शोधनिबंधांचा आणि शोधप्रकल्पांचा समावेश करतात. यापूर्वी स्वेरी अंतर्गत असलेल्या अनेक प्राध्यापक व विद्यार्थ्यांचे अनेक आंतरराष्ट्रीय दर्जा असलेल्या प्रकाशनामध्ये अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. आता प्रा. दिग्विजय रोंगे यांच्या शोधनिबंधाची भर पडली आहे. स्वेरीत संशोधनाचे वातावरण असल्यामुळे अनेक शिक्षक व प्राध्यापकांचा कल हा शोधनिबंधांकडे लागलेला असतो. त्यातून अनेक शोधनिबंध निर्माण होत आहेत. प्रा. दिग्विजय रोंगे हे सध्या स्वेरीज् कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठसोलापूर मधून पीएच.डी. चे शिक्षण घेत आहेत. बेगेल हाऊस’ च्या जर्नल ऑफ हीट ट्रान्सफर‘ मध्ये शोध निबंध प्रकाशित झाल्यामुळे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.पी. रोंगेसंस्थेचे अध्यक्ष दादासाहेब रोंगेउपाध्यक्ष हनीफ शेख यांच्यासह इतर विश्वस्त व पदाधिकारीस्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज डॉ. एम.एम.पवारस्वेरी अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयांचे प्राचार्यसर्व अधिष्ठाताविभागप्रमुखप्राध्यापकवर्गशिक्षकेतर कर्मचारीविद्यार्थी व पालकांनी प्रा.दिग्विजय रोंगे यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *