ताज्याघडामोडी

पंढरपूर सिंहगड विद्यार्थ्यांचे सामाजिक बांधिलकीतून रक्तदान

पंढरपूर: प्रतिनिधी 

एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी पंढरपूर शहर पोलीस स्टेशन तसेच मुंबई येथील दहशतवादी हल्ल्यातील सर्व शहीद आणि पंढरपूरचे वीरपुत्र मेजर कुणाल गोसावी यांचे स्मरणार्थ रक्तदान शिबीरात सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जोपासली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी दिली.

मुंबई येथे झालेल्या २६ /११ दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक जवान व पोलीस शहीद झाले त्यांच्या स्मरणार्थ तसेच पंढरपूरचे सुपुत्र वीरपुत्र कुणाल गोसावी यांच्या स्मरणार्थ पंढरपूर शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन हे उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यादरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय पंढरपूर व पंढरपूर ब्लड सेंटर पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमानाने शहीद स्मृती निमित्त हे रक्तदान शिबीर घेण्यात आले. यामध्ये पंढरपूर व पंढरपूर परीसरातील सर्व महाविद्यालय व सर्व तरुण युवकांना रक्तदान करण्याचे आव्हान करण्यात आले होते. याच अनुषंगानेच एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केले.

राज्यांमध्ये वाढणारा रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी रक्तदान शिबिर यासारख्या शिबिरामध्ये सहभागी होऊन रक्तदान करणे सध्या तरी गरजेचे आहे. पंढरपूर सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेज मधील राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत महाविद्यालयातील ५० हुन

अधिक विद्यार्थ्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा व सामाजिक सलोखा अबाधित राखण्याचा प्रयत्न केला. समाजामध्ये एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे. या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 

   या शिबिरास प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्यासह राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक प्रा. चंद्रकांत देशमुख, प्रा. सुमित इंगोले, प्रा. अजित करांडे, प्रा. अर्जुन मासाळ, प्रा. सिद्धेश्वर गणगोंडा, प्रा. अतुल आराध्ये यांनी प्रोत्साहन दिले. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी एनएसएस प्रेसिडेंट नागेंद्रकुमार नायकुडे या समवेत सुमित गुडे, दिनेश रंदवे, सोहेल देशमुख, तेजस खारे, आकाश गंजाळे यासह अनेक विद्यार्थ्यांनी रक्तदान शिबिरास यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *