ताज्याघडामोडी

पंढरीत लिंकरोडवर गतीरोधक बसवा – यशवंत डोंबाळी 

पंढरपूर शहरातील कराड – पुणे लिंकरोडवर बेफामपणे जड व अवजड वाहने तसेच चारचाकी , दुचाकी वाहने वेगाने चालवतात . वास्तविक हा लिंकरोड उपनगरांजवळून जातो , तसेच शाळा काॕलेजेसला जाणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थिनींची सतत वर्दळ लिंकरोडवरून असते , जेष्ठ नागरीक ही पहाटे लिंकरोडवर फिरावयास असतात , तसेच उपनगरातील नागरीकांना शहरात जाण्यासाठी लिंकरोड हाच एकमेव रहदारीचा रस्ता आहे . त्यामुळे लिंकरोडवर सतत अपघात होत असतात म्हणूनच जिल्हाधिकारी सोलापूर व पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण यांना लिंकरोडवर पाच ते सहा ठिकाणी गतीरोधक लावावेत अशी मागणी स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष यशवंत जगन्नाथ डोंबाळी यांनी केली आहे .

तसेच श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीरात भाविकांना गर्दी नसतानाही विनाकारण लांब बारीतून यावे लागत असल्याने त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतोय , यासाठी जास्त गर्दी नसताना नामदेव पायरी शेजारील बाजूने मंदीरात दर्शनासाठी प्रवेश द्यावा तसेच पंढरपूर शहरातील भाविकांसाठी सकाळी व सायंकाळी दोन तास वेळ दर्शनासाठी राखीव ठेवण्यात यावी अशीही मागणी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदीराचे कार्यकारी अधिकाऱ्यांकडे स्फूर्ती फाउंडेशनने मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *