प्रतिनिधी –
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील विविध गावांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ यांच्या माध्यमातून एस.टी.गाड्यांच्या नवीन १६ फेऱ्या सुरु करण्यात आल्याची माहिती आमदार जनसंपर्क कार्यालय यांच्यामार्फत देण्यात आली आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील गावांच्या गावभेट दौऱ्यादरम्यान या नवीन गाड्यांच्या फेऱ्या सुरु होण्यासाठी संबंधित गावातील नागरिकांनी आ आवताडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती.
ग्रामीण भागातील जनतेच्या संपर्क व प्रवास सुविधेचे प्रभावी माध्यम म्हणून लालपरी गाव-खेड्यातील नागरिकांशी आत्मीयतेचे नाते टिकवून आहे. आ आवताडे यांच्या माध्यमातून या फेऱ्या सुरु होण्यासाठी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करण्यात आला होता. पवित्र श्रावण महिन्यातील पुरुषोत्तम अधिक मास हा मंगल महिना सगळीकडे साजरा होत आहे. या महिन्याच्या निमित्ताने अनेक महिला-भगिनी राज्यभर देवदर्शनासाठी जात असतानाच या फेऱ्या सुरु झाल्याने भाविकांची व शालेय विद्यार्थ्यांची खूप मोठी सोय होणार आहे. आ आवताडे यांच्या मागणीच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ सोलापूर जिल्हा नियंत्रक तसेच मंगळवेढा आगारप्रमुख यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील कोणत्याही गावामध्ये शालेय विद्यार्थी अथवा ग्रामस्थांची एस.टी.अभावी गैरसोय व हेळसांड होत असल्यास संबंधित मार्गावरील नागरिकांनी आपल्या वाढीव फेऱ्यांच्या मागणीचे निवेदन आमदार जनसंपर्क कार्यालय पंढरपूर व मंगळवेढा येथे आणून द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.
नव्याने सुरु झालेल्या फेरीचे नाव- ६.१५ वाजता बठाण, ६.३० वाजता सोहाळे, ७.०० वाजता सिद्धेवाडी, ७.४५ वाजता लवंगी, ९.०० वाजता अरळी, ११.३० वाजता भोसे, २.०० वाजता गुंजेगाव, ३.३० वाजता अरळी, ३.४५ वाजता जंगलगी, ५.४५ वाजता गुड्डापूर मुक्काम, ८.०० वाजता भोसे मुक्काम, ५.३० वाजता लवंगी, ९.४५ व ४.३०वाजता माळेवाडी, ८.४५व ४.०० वाजता रेवेवाडी, ७.१५,१०.३०, ११.४५, ६.१५ वाजता मुंढेवाडी, ९.४५ शिरनांदगी.