ताज्याघडामोडी

मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या अन्यथा…; मंत्रालय उडवून देण्याची दुसऱ्यांदा धमकी

मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणारा निनावी फोन आल्यानं सुरक्षा यंत्रणाचं धाबं पुन्हा दणाणलं आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. एका व्यक्तीनं फोन करून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचं सांगितल्यानंतर मंत्रालयात सध्या पोलिसांकडून शोध मोहीम सुरू आहे. निनावी फोन करणाऱ्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिदेंशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांनी न बोलल्यास मंत्रालयात बॉम्ब टाकून मंत्रालय उडवून देण्याची धमकी दिली.

निनावी कॉल आल्यानंतर काही वेळातच पोलिसांनी मंत्रालयात शोधमोहीम सुरू केली. श्वान पथकही मंत्रालयात दाखल झालं आहे. पोलीस मंत्रालयाच्या प्रत्येक कानाकोपऱ्याची तपासणी करत आहेत.

मंत्रालयात धमकीचा फोन करणारी व्यक्ती मूळची अहमदनगरची आहे. या व्यक्तीला काही कारणास्तव मुख्यमंत्र्यांशी संपर्क करून संवाद साधायचा आहे. या व्यक्तीचा मुख्यमंत्र्यांशी संपर्क होऊ न शकल्याने त्यांनी धमकी दिली. निनावी फोन करणाऱ्यानं मुख्यमंत्री एकनाथ शिदेंशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिदेंशी संवाद न झाल्यास मंत्रालय बॉम्बनं उडवून देण्यात येईल, असं धमकी देणाऱ्या अज्ञातानं म्हटलं आहे. अहमदनगर येथून अज्ञातानं फोन केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *