गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

दीर अन् वहिनी ३ दिवस गायब, मग वेगवेगळ्या ठिकाणी मृतदेह, अखेर गूढ उकललं

दीर आणि वहिनीच्या मृत्यूचं गूढ अखेर उलगडलं आहे. या दोघांचाही संशयास्पद मृत्यू झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. पोलिसांनाही काही सुगावा सापडत नव्हता. त्यांच्या मृत्यूमागील कारण पोलिस शोधत होते. अखेर या दोघांच्या मृत्यूचं गूढ उकललं आहे. या दोघांचा मृत्यू हा प्रेमप्रकरणातून झाल्याची माहिती समोर आली आहे.

मृतक दीर विवेक कुमारच्या आईने स्वत: एफआयआर दाखल करत संपूर्ण सत्य पोलिसांना सांगितले आहे. वहिनीने जन्म दिलेलं मूल हे देखील विवेकचेच होते, असेही सांगण्यात आले आहे.

मृतक दीर विवेक कुमारची आई रामशीला देवी यांनी एफआयआरमध्ये सांगितलं आहे की, शेजारी विलास राय यांचा मुलगा देवेंद्र राय याचं लग्न मशहान गावातील इंद्रेश देवीसोबत झाले होते. इंद्रेशचं तिच्या पतीसोबत पटत नव्हतं. दरम्यान, इंद्रेश देवी तिच्या शेजारी राहणारा दीर विवेकच्या प्रेमात पडली होती. त्याच्या आईच्या म्हणण्यानुसार, दोघांमध्ये सुमारे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. दोघांच्या नातलगांनाही त्यांच्या संबंधांबाबत माहिती होतं. या दोघांचे प्रेम संबंध पुढे चालूच होते. दोघांच्या नातेवाईकांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्नही केला. पण, ते काही ऐकले नाही.

मृत विवेकच्या आईने एफआयआरमध्ये सांगितलं की, विवेक आणि इंद्रेश देवी यांची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला, पण दोघेही काही समजायला तयार नव्हते. दरम्यान, इंद्रेश ही गरोदर राहिली. प्रेमशीला यांच्या सांगण्यानुसार इंद्रेशच्या पोटात विवेकचंच बाळ होतं. दोघांनाही लग्न करायचे होते, पण घरातील लोक तयार नव्हते.

१ जुलै रोजी विवेक इंद्रेशला दुचाकीवरून घेऊन नैहर येथे गेला. तीन दिवस ते परत आले नाही. २ जुलै रोजी इंद्रेश देवीचा मृतदेह परिहार बाजार येथे आढळला होता, ४ जुलै रोजी थेट विवेकचा मृतदेह गावात आढळून आला. त्याच्या चेहऱ्यावर फेसाचा पांढरा डाग पडलेला होता. याप्रकरणी इंदेश देवीचे वडील रामवीर राय, मनीष कुमार, ओमप्रकाश कुमारसह इतर काही जणांची नावं संशयित म्हणून समोर आली आहेत. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *