गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

सासरच्या लोकांशी किरकोळ वाद, विवाहितेला उठाबशा घालायला लावल्या अन्…

घरगुती करणाहून पतीसह सासरच्या लोकांनी विवाहितेला घरात तब्बल १५० उठाबशा काढण्याची शिक्षा दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे; तसेच विवाहितेचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्नही करण्यात आला. हा प्रकार ९ मे रोजी किवळे येथील आदर्शनगर येथे घडला. या प्रकरणी पीडित विवाहितेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जावेद मुबारक मुल्ला, मुबारक मुल्ला, मोसिन मुबारक मुल्ला, दोन महिला (सर्व रा. आदर्शनगर, किवळे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२२मध्ये फिर्यादी महिलेचा विवाह झाला. त्यानंतर सासरच्या लोकांनी घरातील किरकोळ कारणावरून तिच्यासोबत वाद घातला. फिर्यादी महिलेस शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली; तसेच गळा दाबून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीस घरामध्ये जबरदस्तीने १५० उठाबशा काढायला लावल्या. या प्रकरण देहूरोड पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष जाधव तपास करत आहेत.

पीडित विवाहितेचा पती इंजिनीअर आहे. एका कंपनीत ते नोकरी करतात. पीडित विवाहितेचे सासरचे कुटुंब सुशिक्षित आहे. मात्र, असे असतानाही घरात विवाहितेचा छळ करण्यात आला. तिला १५० उठाबशा काढायला लावण्याची शिक्षा करण्यात आली; तसेच तिचा छळ करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *