ताज्याघडामोडी

..आताच दावा करतो, अजितदादांनी मुख्यमंत्रिपदाबद्दल पहिल्यांदाच मनातलं बोलून दाखवलं

‘2024 मुख्यमंत्रिपदावर दावा करण्याची गरज काय, मी आताही दावा सांगू शकतो. 2024 ची कशाला वाट बघू, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपदाबद्दल मनातलं बोलून दाखवलं आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय भूकंप अटळ असणार आहे.पुण्यात दैनिक सकाळ समुहाच्या वतीने अजित पवार यांची प्रकट मुलाखत घेण्यात आली. यावेळी बोलत असताना अजित पवार यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं.

‘मी आता देखिल राज्याच मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. मी पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे ह्या दोन्ही माजी मुख्यमत्र्यांसोबत काम केलं. दोघांनाही आमदारकी पदाचा अजिबात अनुभव नव्हता. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत आम्ही आनंदाने काम केलं. पृथ्वीराज चव्हाण सोबत आमच्या पक्षातील वरिष्ठांनी सागितलं म्हणून काम केलं, असंही पवार म्हणाले.

माझा आजचा कार्यक्रम पूर्वनियोजितच होता. शरद पवार सुद्धा तिथे आहे. पण हा कार्यक्रम अडीच महिन्यांपूर्वीच ठरला होता. त्यामुळे मी इथं आलोय. त्यामुळेच मी मुंबईच्या पक्षाच्या शिबिराला हजर राहू शकलो नाही. पण मीडियातून उगीच संभ्रम निर्माण केला जातो. मला या कार्यक्रमामुळे तिथे जाता आलं नाही, असा खुलासाही पवारांनी केला.

राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदाचं अजिबात आकर्षण नाही पण प्रत्येक वेळी एकतर आमच्या जागा कमी आल्या पण एकदा मुख्यमंत्रिपदाची संधी असताना वरिष्ठ पातळीवर काही वेगळा निर्णय झाला आणि पक्षाने ती संधी गमावली, असंही पवार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *