ताज्याघडामोडी

डिओडरंट फवारताच हृदयविकाराचा झटका

    १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, डॉक्टरांनी धोका सांगितला

परफ्युम किंवा डिओडरंट हे दैनंदिन वैयक्तिक स्वच्छतेसाठी किंवा दुर्गंधीनाशक म्हणून अनेकांच्या नित्यक्रमाचा भाग झाल्याचे दिसून येऊ शकते. मात्र त्यांच्यातील काही घटक अल्पावधीतच मोठी हानी पोहोचवू शकतात. कधीकधी, डिओडरंट्समधील रसायने त्वचेला हानी पोहोचवू शकतात, त्यामुळे पुरळ आणि जळजळ होऊ शकते. मात्र साईड इफेक्ट्सची यादी इथेच संपत नाही. डिओडरंट फवारल्याने एका १४ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना यूकेमध्ये घडली आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार मुलीने चुकून एरोसोलचे श्वसन केल्याने तिला कार्डिअॅक अरेस्ट म्हणजेच हृदयविकाराचा झटका आला.

यूकेमध्ये राहणारी जॉर्जिया ग्रीन पूर्णपणे निरोगी आणि तंदुरुस्त होती. तिने तिच्या बेडरूममध्ये डिओडरंट फवारले होते. खरं तर ती कधीच गंभीर आजारीही पडली नव्हती, मात्र यानंतर जॉर्जिया तिच्या खोलीत तिच्या आईला मृतावस्थेत आढळली. जॉर्जियाला ऑटिझम होता. तिच्या वडिलांच्या माहितीनुसार तिला ब्लँकेटवर डिओडरंट फवारणे आवडत असे, कारण हा सुगंध तिला हवाहवासा वाटे, यामुळे तिला शांत आणि रिलॅक्स वाटण्यास मदत होत असे.

डिओडोरंट्समधील एरोसोलमध्ये विषारी किंवा प्राणघातक रसायने आणि वायू असू शकतात. अशा घटना फक्त मुलांपुरत्या मर्यादित नाहीत. तज्ज्ञांच्या मते याबद्दल जागरूकता पसरवणे आणि डिओडोरंट्सच्या सुरक्षित वापराचा प्रचार करणे गरजेचे आहे. याव्यतिरिक्त, ही उत्पादने लहान मुलांच्या आवाक्यापासून दूर ठेवणे आणि लहान मुलांसाठी त्यांचा वापर मर्यादित करणे किंवा टाळणे अत्यावश्यक आहे. त्याऐवजी, लहान मुलांसाठी टॅल्कम पावडर वापरता येऊ शकतात.

⚡️Republic Day Offer⚡️🇮🇳🇮🇳️
टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट
स्मार्ट वॉच फक्त 2495/-
👓TITAN , Fastrack
फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट*⭐ बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI
👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या
टायटन वर्ल्ड | टायटन आय +
एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला
संपर्क -7507 995 995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *