ताज्याघडामोडी

नोकरदारवर्गाला मोठा धक्का,पेन्शनधारकांवर टांगती तलवार

२०१४ पूर्वी निवृत्त झालेल्यांना उच्च निवृत्ती वेतन देणे थांबविण्याचे आदेश 

नवी दिल्ली: देशातील हजारो पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफओने के परिपत्रक जारी केले आहे, ज्यानंतर तुम्हाला मोठा धक्का बसू शकतो. पेन्शन परिपत्रकानुसार लोकांच्या पेन्शनधारकांवर पेन्शन कपातीची टांगती तलवार आहे. ईपीएफओने आपल्या स्थानिक अधिकाऱ्यांना २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्यांना उच्च निवृत्ती वेतन देणे थांबविण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच या व्यवस्थेअंतर्गत त्यांना देण्यात आलेली अतिरिक्त रक्कमही वसूल करण्यास सांगितले आहे. या संदर्भात ईपीएफओने बुधवारी एक परिपत्रक जारी केले.

१ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झालेल्या आणि उच्च वेतनावर पेन्शन सुविधेचे सदस्यत्व न घेतलेल्या अशा प्रकरणांचा आढावा घेतला जाईल, असे संघटनेने म्हटले. ईपीएफओने म्हटले की १ सप्टेंबर २०१४ पूर्वी निवृत्त झाले आहेत, जर त्यांनी या सुविधेचा पर्याय निवडला नसेल तर त्यांना अधिक पेन्शन दिले जाऊ नये. ईपीएफओच्या परिपत्रकानुसार, जानेवारी २०२३ पासून अशा पेन्शनधारकांच्या जास्त पेन्शनवर बंदी घालावी. यानंतर, त्यांच्या पेन्शनमध्ये ५ हजार किंवा ६ हजार ५०० रुपये पगाराच्या आधारावर सुधारणा केली जाईल. ईपीएफओने या परिपत्रकात ईपीएस-९५ च्या परिच्छेद ११(३) चा संदर्भ दिला, जो कर्मचाऱ्याच्या कमाल पेन्शन पात्र पगाराबद्दल माहिती देतो. पेन्शनमध्ये सुधारणा करण्यापूर्वी पेन्शनधारकाला आगाऊ सूचना देण्याचे देखील ईपीएफओने परिपत्रकात म्हटले. या लाभाचा कर्मचारी गेल्या १५ वर्षांपासून फायदा घेत आहेत.

ईपीएफओच्या पात्र पेन्शनधारकांना जास्त पेन्शन मिळवायचे असेल तर त्यासाठी त्यांना संघटनेच्या प्रादेशिक कार्यालयात जाऊन अर्ज भरावा लागेल. यासोबतच योग्य ती कागदपत्रेही सादर करावी लागतील. दरम्यान, अर्ज भरताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात.

Republic Day Offer🇮🇳🇮🇳

टायटन घड्याळांवर 40% पर्यंत सूट

स्मार्ट वॉच फक्त 2495/-

👓TITAN , Fastrack

फ्रेम आणि गॉगलवर 50 % पर्यंत सूट* बजाज फायनान्स / क्रेडिट कार्डवर 1 मिनिटात EMI

👉3/6/9/12 महिने EMI *आजच भेट द्या

टायटन वर्ल्ड | टायटन आय +

एस टी स्टॅन्ड जवळ ,भोपळे रोड ,सांगोला

संपर्क -7507 995 995

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *