पंढरपूर शहर व तालुक्यातील कोरोणा बाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसात दिलासादायक घट होताना दिसून येत असून आज १ मे रोजी प्राप्त झालेल्या अहवालानुसार एकूण ८२ कोरोना बाधिताची नव्याने नोंद झाली असून यामध्ये पंढरपूर शहर ९ तर ग्रामीण भागात ७३ बाधित आढळून आले आहेत. आजच्या अहवालानुसार ग्रामीण भागातील ४ व्यक्तीच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात घट होत असून आजच्या अहवालानुसार ८५४ बधितांवर उपचार सुरू आहेत.
