ताज्याघडामोडी

मुलगी पळून गेल्यानं बाप आणि चुलत्याने केले भयंकर कृत्य

मुलगी पळून गेल्यानं समाजात बदनामी झाल्याने बाप आणि चुलत्याने या मुलीला भायनक शिक्षा दिली आहे. पोलिसांनी मृत तरुणीच्या पित्यासह तिच्या काकांना अटक केली आहे. जालना तालुक्यातील पिरपिंपळगाव येथे उघडकीस आली आहे. या प्रकरणी संतोष भाऊराव सरोदे, नामदेव भाऊराव सरोदे अशी या प्रकरमातील संशयीत आरोपींची नावे आहेत.

मुलीच्या वडिलांनी आणि चुलत्याने तिला झाडाला लटकवून गळफास दिला. ही हत्या नसून तरुणीने आत्महत्या केली असल्याचे भासवण्यासाठी या दोघांनी अगदी नियोजनबद्ध पद्धतीने तिची हत्या केली. यानंतर  अंत्यविधी करुन पुरावा नष्ट करण्याच्या प्रयत्न केला.  गावात चर्चा झाल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *