ताज्याघडामोडी

चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणात एका पत्रकाराला अटक; कटात सामील असल्याचा गुन्हा दाखल

राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणात एका न्यूज चॅनेलच्या पत्रकाराला अटक करण्यात आली आहे. पत्रकार गोविंद वाकडे यांना या प्रकरणात अटक केली आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या आरोपींच्या संपर्कात गोविंद वाकडे आधीपासून होते अशी माहिती पोलीसांना मिळाली आहे. गोविंद वाकडे आणि आरोपींमधील फोन कॉल आणि व्हॉट्सअप चॅट देखील पोलीसांना सापडलं आहे. त्यानंतर गोविंद वाकडेंवर कटात सामील असल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई मराठी पत्रकार संघानं चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर झालेली शाईफेक अयोग्य व निषेधार्ह आहे. पण या शाईफेकीची बातमी टिपणाऱ्या पत्रकाराला अटक करण्याची मागणी त्याहून अधिक निषेधार्ह आहे. सदर पत्रकाराच्या अटकेसाठी आपण उपोषणास बसणार असल्याची धमकी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पाटील यांनी दिली आहे. पाटील यांच्या या लोकशाही विरोधी कृत्याचा मुंबई मराठी पत्रकार संघ तीव्र शब्दांत निषेध करत आहे. पाटील यांनी आपले विधान मागे घेऊन दिलगिरी व्यक्त करावी. त्यांनी तसे न केल्यास लोकशाही मार्गाने आम्हाला पुढील आंदोलनाचा विचार करावा लागेल असे मुंबई मराठी पत्रकार संघ अध्यक्ष नरेंद्र वाबळे आणि कार्यवाह ,संदीप चव्हाण यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *