ताज्याघडामोडी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाविरोधात महाविकास आघाडीचा 17 डिसेंबरला मोर्चा

महाराष्ट्र- कर्नाटक वाद, शिवाजी महाराजांबद्दल होणारी वक्तव्यं, राज्याबाहेर जाणारे उद्योग अशा विविध विषयांच्या पार्श्वभूमीवर आज (5 डिसेंबर) महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली.

या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार, काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधला.यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, महाराष्ट्रात फुटीची बीजं रोवली जात आहेत. काही गावं म्हणताहेत की, आम्हाला कर्नाटकात जायचंय, काही गावं म्हणतात आम्हाला तेलंगणात जायचंय, गुजरातमध्ये जायचंय. यापूर्वी असं काही झालं नव्हता.

“राज्यपाल शिवाजी महाराज, महात्मा फुले-सावित्रीबाई फुले यांसारख्या अपमान करताहेत. महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होत आहे,” असं उद्धव यांनी म्हटलं.”गुजरातच्या निवडणुकीपूर्वी इथले उद्योग गुजरातमध्ये गेले, आता काही महिन्यांनी कर्नाटकात निवडणुका आहेत. मग तिथली मतं मिळवण्यासाठी आपली गावं कर्नाटकला जोडणार का?” असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

विधीमंडळाचं अधिवेशन 19 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी १७ तारखेला सकाळी अकरा वाजता महाविकास आघाडीच्या वतीने एक भव्य मोर्चा काढला जात असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.या मोर्चामध्ये कपिल पाटील, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील हेही सहभागी होतील अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

सीमाभागांमधील गावांतून बाहेर पडण्याची मागणी होणं हे दुर्दैवी आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री वारंवार विधानं करत आहेत. पण त्यांना उत्तर देण्याची धमक तुमच्यात नाहीये का? असा प्रश्न अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला.

राज्यातील उद्योग बाहेर जात आहेत आणि नको ते उद्योग सुरू आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. कपिल पाटील, अबू आझमी, शेकापचे जयंत पाटील या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *