ताज्याघडामोडी

फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सॉफ्ट स्किल मॅनेजमेंट वरती मार्गदर्शन संपन्न

सांगोला: फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सॉफ्ट स्किल वरती व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शना करिता मार्गदर्शक म्हणून एस डी पाटील इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी इस्लामपूर येथील प्राचार्य डॉ. सोमकांत जावरकर हे उपस्थित होते. त्यांचा सत्कार फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय बैस यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमासाठी डिप्लोमा द्वितीय वर्षातील विद्यार्थी व डिग्रीच्या शेवटच्या वर्षातील एकूण ११० विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना डॉ. सोमकांत जावरकर यांनी मुलाखत कौशल्य, सकारात्मक दृष्टीकोन, व्यक्तिमत्व विकास,ध्येयप्राप्तीसाठी सकारात्मक विचार आणि हार्ड वर्क या गोष्टी विद्यार्थ्यांनी कशा आत्मसात कराव्यात याबद्दलची माहिती दिली. तसेच मोठंमोठ्या कंपनीमध्ये काम करण्यासाठी लागणारे कौशल्य यासारख्या विषयावर त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा खूप फायदा झाल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी स्पष्ट केले.

सदर कार्यक्रमात डॉ. जे पी लव्हांडे, प्रा एस बी नागनसूरकर,प्रा एस आर माने, प्रा एस जे मणेरी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन डॉ.सविता सोनवणे व प्रा.रोहित पवार यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *