Uncategorized

डाँ.हरी भोसले यांना व्यसनमुक्ती-मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार प्रदान

समर्थ सोशल फाउंडेशन व न्यूट्रिफिल हेल्थ प्रो.प्रा.लि. व जनरल हॉस्पिटल कोल्हापूर यांचे कडून दिला जाणारा व या संस्थेचे सर्वेसर्वा श्री.सादिक शेख साहेब, संचालक सुहास पाटील, अस्लम शेख साहेब, निवासी व्यसनमुक्ती हाँस्पीटलचे डॉ सागर देसाई आणि त्यान्चे सर्व संचालक मंडळ यांनी डॉ हरी भोसले सर यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती-मधुमेहमुक्ती दूत पुरस्कार काल 11 ला कोल्हापूर येथील अञिया हाँटेल मध्ये समारंभ पुर्वक देण्यात आला.

या कार्यक्रमासाठी लाभलेले प्रमुख पाहुणे सन्माननीय श्री अतुल भि आकुर्डे साहेब
सहाय्यक संचालक वित्त विभाग, मंत्रालय मुंबई यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
त्यावेळी, श्री विशाल जाधव साहेब युवा उद्योगपती शिव समर्थ असोसिएट्स चे मॅनेजिंग डायरेक्टर, श्री संदीप गडकर साहेब, मोटार वाहन निरीक्षक (RTO), कोल्हापूर, संस्था अध्यक्ष डॉ सादिक शेख साहेब व सर्व संचालक मंडळ महाराष्ट्रातून पुरस्कारा साठी निवड झालेले सर्व 28 पुरस्कर्ते उपस्थित होते. डॉ हरी भोसले सर हे पुणे विद्यापीठाचे पीएच.डी धारक असून गेल्या 15 वर्षापासून ते आयुर्वेदीक क्षेञात कार्य करीत आहेत. लहानपणापासून त्याना आयुर्वेदाची आवड आहे. आरोग्यशास्त्र, शरीरशास्त्र, नॅचरोपॅथीचे त्यान्चे टेंऱ्निंग झालेले आहे. औषधी वनस्पती, सेंद्रीय शेती यावर त्यान्ची लेक्चर असतात . आयुष भारत संघटनेचे ते सभासद असून सद्या ते सांगोला तालुका नॅचरोपॅथिसस्ट संघटनेचे अध्यक्ष आहेत. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयचे ते अध्यक्ष आहेत. साहित्य क्षेत्रात ही त्यान्चे मोलाचे कार्य आहे. सन 2019 पासून व्यसनमुक्ती-मधुमेहमुक्ती चे त्यान्चे कडे केंद्र आहे. त्याच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा राज्यस्तरीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांमुळे त्याचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *