

पुण्यातील ससून रुग्णालयात धक्कादायक घटना घडली असून मोक्का अंतर्गत कारवाईत येरवडा कारागृहात कैद असलेल्या आरोपीस ससून रुग्णालयात उपचारासाठी ऍडमिट केले असताना प्रतिस्पर्धी गटातील तीन ते चार जणांनी सदर तुषार हंबीर याच्यावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल. मात्र, यावेळी तेथे ड्युटीवर असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. त्यामध्ये संबंधीत पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
उपचार करण्यासाठी हॉस्पिटलमधून हंबीर याला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात आलेल्या अज्ञात दोघाजणांनी हंबीर याच्यावर फायरिंग करण्याचा प्रयत्न केला. फायरिंग चुकली असता हल्लेखोराने कोयत्याने वार करीत हंबीर यांच्यावर खुनी हल्ला केला. यावेळी हंबीर याला वाचवण्यासाठी गेलेले पोलीस कर्मचारी हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. ससूनसारख्या सर्वोच्च रुग्णालयात खुनीहल्ला झाल्याने हाॅस्पिटलसह शहरामध्ये खळबळ उडाली आहे.