“सीआरआयएफ” हाय मार्क क्रेडिट इन्फॉर्मेशन सर्विसेस प्रा. लिमिटेड हि भारतातील आर बी आय मान्यताप्राप्त क्रेडिट ब्युरो आहे. हि कंपनी कृषी आणि ग्रामिण, एमएसएमई, व्यवसायिक आणि मायक्रोफायनान्स सेवा देत आहे. २००५ मध्ये स्थापन झालेल्या “सीआरआयएफ” कंपनीत पंढरपूर सिंहगड इंजिनिअरींग काॅलेज मधील कुमारी माधुरी मोहन गायकवाड राहणार कडलास (ता. सांगोला) हिची “सीआरआयएफ” कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असल्याची माहिती काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभाग प्रमुख प्रा. सुभाष पिंगळे यांनी दिली.
एस.के.एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरींग महाविद्यालयातील काॅम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरींग विभागात अभियांत्रिकीचे शेवटच्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या कुमारी माधुरी मोहन गायकवाड रा. कडलास (ता. सांगोला) या विद्यार्थिनींची “सीआरआयएफ” या कंपनीत कॅम्पस मुलाखतीतून निवड झाली असुन कंपनीकडून ६.५ लाख वार्षिक पॅकेज मिळणार आहे. प्रत्येक वर्षी पंढरपूर सिंहगडचे प्लेसमेंट वाढत असुन विद्यार्थी व पालक वर्गातून आनंद व्यक्त होत आहे.
“सीआरआयएफ” कंपनीत निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उप-प्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर डॉ. समीर कटेकर, डाॅ. चेतन पिसे, डाॅ. भालचंद्र गोडबोले, डाॅ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश कदम, डाॅ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. राजेंद्र पाटील, प्रा. संदीप लिंगे, प्रा. अभिजित सवासे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
