ताज्याघडामोडी

राहते घरावर मावस सासूकडून बळजबरीने कब्जा करण्याचा प्रयत्न

सततच्या त्रासाला कंटाळून पंढरपूरात विवाहितेची आत्महत्या

राहते घरजागेवर बळजबरीने कब्जा केल्याच्या कारणावरून तसेच मागील अडीच वर्षांपूर्वी पासून सातत्याने भांडण काढून व शिवीगाळ करून फिर्यादी महेश यांच्या मावस सासू व तिच्या मुलीकडून देण्यात येत असलेल्या मानसिक त्रासातून पंढरपुरात विवाहितेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना शनिवार दिनांक १३ रोजी सायंकाळच्या सुमारास घडली असून या प्रकरणी मयत शीतल महेश अधटराव हिची मावशी सुवर्णा उर्फ सविता अरुण कोळी व स्वप्ना शेखर गोणे यांच्या विरोधात मयताचे पती महेश मोहन अधटराव यांनी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.    
      दाखल फिर्यादीनुसार पंढरपूर शहरातील छत्रपती संभाजी चौक परिसरातील रहिवाशी महेश मोहन अधटराव हे फुटपाथवर घड्याळ विक्रीचा व्यवसाय करतात.ते रहात असलेली सर्व्हे नंबर १९ हि घरजागा त्यांनी दोन ते अडीच वर्षांपूर्वी खरेदी केली होती.या खरेदी केलेल्या घरजागे पैकी एक खोली हि माझे मालकीची आहे असा दावा करीत फिर्यादी महेश यांच्या मावस सासु सुवर्णा उर्फ सविता अरुण कोळी व स्वप्ना शेखर गोणे या सातत्याने भांडण करीत होत्या.व खोली खाली करा म्हणून धमकी देत होत्या.शनिवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुवर्णा उर्फ सविता अरुण कोळी व स्वप्ना शेखर गोणे या फिर्यादीच्या घरी आल्या व फिर्यादीची पत्नी मयत शीतल यास मारहाण करू लागल्या व शिवागीळ करू लागल्या.त्यानंतर सुवर्णा उर्फ सविता अरुण कोळी व स्वप्ना शेखर गोणे या फिर्यादीच्या घरातील खोलीला कुलूप लावून निघून गेल्या.फिर्यादी महेश मोहन अधटराव हे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यासाठी निघाले असता त्यांची पत्नी शीतल महेश अधटराव यांनी सततच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन केले.मयत शीतल हिस तातडीने बोरावके हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल केले पंरतु दिनांक १४ रोजी पहाटे सव्वादोन वाजनेच्या सुमारास शीतल यांना मृत घोषित करण्यात आले.
   या प्रकरणी पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात सुवर्णा उर्फ सविता अरुण कोळी (रा.पंढरपूर) व स्वप्ना शेखर गोणे   (रा.शाहूपुरी कोल्हापूर ) यांच्या विरोधात भादंवि कलम ३०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.                        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *