

पंढरपूर तालुक्यातील गार्डी येथे अनुसूचित जमाती प्रवर्गातील ठाकर ठाकूर समाज वास्तव्यास असून दिनांक ९ ऑगस्ट हा जागितक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो.या आदिवासी दिनाचे औचित्य साधत गार्डी ग्रामपंचायतीच्या वतीने जागितक आदिवासी दिन उत्सहात साजरा करण्यात आला.आदिवासी क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन सरपंच शिवकुमार फाटे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमख अतिथी म्हणून पंचायत समिती सदस्य सत्यवान देवकुळे,शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष तालुका प्रमुख शांताराम यादव,महाराष्ट्र एसटी ठाकूर,ठाकर जमात संरक्षण व संघर्ष युनिटीचे पश्चिम म.अध्यक्ष अंकुश छगन साळूंखे,कृषी उप्तन्न बाजार समितीचे संचालक नीलकंठ इनामदार,युवा सेना तालुका प्रमुख सोमनाथ अनपट, सोसायटी संचालक कादर मुलाणी,शिवसेना गट प्रमुख शिवाजी जाधव,माजी तंटामुक्त अध्यक्ष संभाजी इनामदार,सोसायटी चेअरमन सुधाकर भिंगे यांच्यसह ग्राम पंचायत सदस्य,इतर सोसायटी संचालक उपस्थित होते.यावेळी ठाकर ठाकूर समाजातील दत्ता धुमाळ सर,वैभव धुमाळ,भारत साळुंखे,जितेंद्र साळुंखे,विकास भाट यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.