ताज्याघडामोडी

सहकार शिराेमणी सह ७ साखर कारखान्यांना आरसीसी कारवाईची नोटीस

अनेक साखर कारखान्यांनी दिली 7० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी 

राज्यातील सात साखर कारखान्याने शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे नुसार बिले दिले नाही, म्हणून राज्य साखर आयुक्तालयाने राज्यभरातील सात साखर कारखान्यांना आरआरसीनुसार नाेटीस बजावल्या आहेत.

7० टक्क्यांपेक्षा कमी एफआरपी देणारे हे कारखाने असून त्यांनी एकूण १४५०३.५९ लाख आरआरसी रक्कम थकवली आहे. यात प्रामुख्याने राजकीय नेत्यांचे साखर कारखाने अडचणीत आल्याचे दिसून येते.

नाेटीस बजावलेले साखर कारखाने खालीलप्रमाणे – या सात कारखान्यांमध्ये सर्व संचालक हे कुठल्या ना कुठल्या राजकीय पक्षाशी निगडित नेते आहेत. त्यामुळे, राजकीय नेत्यांच्या साखर कारखान्यावर नोटीस दिल्या आहेत.

नाेटीस बजावलेले साखर कारखाने खालीलप्रमाणे –

  • साेलापूर – सहकार शिराेमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर – आरआरसी रक्कम ३६७४.९० लाख ( संबंधित राजकीय नेते – कल्याणराव काळे , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
  • पुणे- राजगड सहकारी साखर कारखाना लिं. भाेर- आरआरसी रक्म २५९१.६९ लाख ( संबंधित राजकीय नेते – आमदार संग्राम थोपटे – काँग्रेस)
  • बीड – अंबेजाेगाई सहकारी साखर कारखाना, अंबेजोगाई आरआरसी रक्कम ८१४.१५ ( संबंधित राजकीय नेते – माजी मंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
  • बीड – वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, परळी – आरआरसीसी रक्कम – ४६१५.७५ लाख ( संबंधित राजकीय नेते – माजी मंत्री पंकजा मुंडे, भाजप)
  • उस्मानाबाद – जयलक्ष्मी शुगर प्राे.नितळी – आरआरसी रक्कम – ३४०.६९ लाख ( संबंधित राजकीय नेते – विजयकुमार दांडनाईक, भाजप)
  • सातारा – किसनवीर ससाका भुईंज, सातारा – आरआरसी रक्कम – ४११.९१ लाख ( संबंधित राजकीय नेते – आमदार मकरंद पाटील , राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष)
  • अहमदनगर – साईकृपा साखर कारखाना, हरिडगाव, अहमदनगर – आरआरसी रक्कम -२०५४.५० लाख – ( संबंधित राजकीय नेते – आमदार बबनराव पाचपुते,भाजप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *