ताज्याघडामोडी

ओबीसी आरक्षणाविना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका नको – एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्या यंदाच्या दिल्ली दौऱ्यात राष्ट्रपती, गृहमंत्री, संरक्षण मंत्री तसंच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहोत. आम्ही शिवसेना आणि भाजप युती करून निवडणुका लढवल्या होत्या. लोकांच्या मनात होतं त्याप्रमाणे युतीचं सरकार आम्ही स्थापन केलं आहे. त्यानंतर वरीष्ठ नेत्यांच्या भेटीला आम्ही आलो आहोत.”

ते पुढे म्हणाले, “हे सरकार लोकांचं आहे. लोकांच्या हिताचं जपणूक करणार आहे. समाजातील सर्वच घटकांना न्याय देणारं हे सरकार आहे. आता पंतप्रधानांना भेटून राज्याच्या विकासात त्यांचं व्हिजन आम्ही समजून घेणार आहोत.”

“दिल्ली दौऱ्यात ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात तुषार मेहता यांच्याशी चर्चा केली. ओबीसी आरक्षणाविना महापालिका किंवा इतर निवडणुका घेण्यात येऊ नयेत, अशी आमची भूमिका आहे,” असं त्यांनी म्हटलं.

“महाराष्ट्राचे तुकडे करण्याचा प्रश्नच नाही. काही जण लोकांची दिशाभूल करण्यासाठी अशा प्रकारचे वक्तव्य करत आहेत,” असं शिंदे म्हणाले.

“बंड केलेले आमदार पैशांच्या मागे गेले नाहीत. बाळासाहेबांच्या विचाराने ते आमच्यासोबत आले आहेत. आम्हाला 164 आमदारांचं समर्थन आहे, त्यामुळे मध्यावधी निवडणुका घेण्याचा प्रश्न नाही,” असंही त्यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *