ताज्याघडामोडी

शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ‘ईडी’ची मोठी कारवाई; मनी लाँन्ड्रिंगचा गुन्हा दाखल

राज्याचे परिवहनमंत्री आणि शिवसेना नेते यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाकडून आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच अनिल परब यांच्याशी संबंधित राज्यातील सात ठिकाणांवर ईडीकडून छापे टाकण्यात आले आहे. या छाप्यांमधून ईडीच्या हाती कोणती माहिती आणि पुरावे लागणार, हे पाहावे लागेल. ईडीच्या या कारवाईमुळे अनिल परब यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे. आता ईडीकडून लवकरच अनिल परब यांना चौकशीसाठी बोलावले जाऊ शकते.

ईडीकडून नक्की कोणत्या ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहे, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट आणि वाहतूक विभागाचे अधिकारी बजरंग खरमाटे यांच्याशी संबंधित प्रकरणात ही कारवाई झाल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *