गुन्हे विश्व ताज्याघडामोडी

शेतजमीन व दागिन्यांसाठी बहिणीला संपवलं; खून प्रकरणाचा पोलिसांकडून पर्दाफाश

शेतजमीन व दागिन्यांसाठी मोठ्या बहिणीचा खून करणाऱ्या भावाला नंदुरबार पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. पोसल्या नागोऱ्या वळवी (वय-55, रा. निजामपुर, ता. नवापुर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने बहिणीचा खून करुन ती बेपत्ता झाल्याची तक्रार विसरवाडी पोलीस ठाण्यात दिली होती.

साकुबाई सुपड्या वळवी (वय-65 रा. निजामपुर ता. नवापुर) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. साकुबाई या 23 फेब्रुवारी 2022 रोजी अचानक बेपत्ता झाल्या होत्या. त्यानंतर 18 मे 2022 रोजी विसरवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांचा मृतदेह कोरड्या नाल्यात सुती गोणपाटात दोरीने बांधलेला आणि कुजलेल्या अवस्थेत आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक पी. आर पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करुन आरोपीचा शोध घेण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साकुबाई वळवी या पतिच्या निधनानंतर एकट्याच राहत होत्या. त्यांना मुल-बाळ नसल्याने त्यांचा सांभाळ करण्यास कोणीच नव्हते. त्यांचा भाऊ त्याच गावात राहत होता. परंतु तो देखील त्यांचा सांभाळ करत नव्हता. साकुबाई एकट्याच शेती करुन आपला उदरनिर्वाह करत होत्या. दरम्यान साकुबाई बेपत्ता झाल्याची तक्रार भाऊ पोसल्या वळवी याने दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *