ताज्याघडामोडी

श्री विठ्ठल आण्णा-भाऊ शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार जाहीर

 युवराज पाटील, गणेश पाटील आणि ॲड. दीपक पवार यांच्या श्री विठ्ठल अण्णाभाऊ शेतकरी विकास पॅनलचे सर्वच्या सर्व २१ उमेदवार जाहीर झाले असल्याची माहिती युवराज पाटील यांनी दिली आहे. श्री विठ्ठल कारखान्याची निवडणूक आता तिरंगी होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीत या पॅनलची लढत भालके काळे महाडिक गटाच्या श्री विठ्ठल शेतकरी विकास पॅनल आणि अभिजित पाटील यांच्या श्री विठ्ठल परिवर्तन विकास पॅनल बरोबर होणार आहे. एकंदरीत २१ जागेसाठी ६३ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत , तर २८ अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत.

सोमवार दि. २७ जून हा दिवस उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा दिवस होता. या निवडणूक रिंगणात २६४ उमेदवार निवडणुकीसाठी उभे होते. यापैकी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १७३ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. तर तिनी पॅनलमधील ६३ उमेदवार वगळता ५८ अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.

भाळवणी ऊस उत्पादक गटातून
दिपक दामोदर पवार (जैनवाडी), मोहन नामदेव बागल (गादेगाव), मधुकर शामराव गिड्डे (भंडीशेगाव) ; करकंब ऊस उत्पादक गटातून रामकृष्ण नारायण जवळेकर (पटकुरोली), सिद्धाराम देविदास पवार (खेडभोसे), शहाजी माणिक मुळे (उंबरे) यांची वर्णी लागली आहे. मेंढापूर गटातून युवराज विलासराव पाटील (येवती) आणि बळीराम यशवंत पाटील (भोसे) तर; तुंगत गटातून विक्रांत चंद्रकांत पाटील (तुंगत), गणेश कृष्णा चव्हाण (सुस्ते) आदी उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सरकोली गटातून प्रवीण रामचंद्र भोसले (सरकोली) आणि बबन रंगनाथ शिंदे (आंबे), तर कासेगाव गटातून प्रशांत अण्णासाहेब देशमुख (कासेगाव), हेमंत प्रकाश पाटील (तिसंगी), माणिक विश्‍वनाथ जाधव (सिद्धेवाडी) संधी देण्यात आली आहे. संस्था मतदारसंघातून बाळासाहेब महादेव पाटील (सुपली), अनुसूचित जाती जमाती मतदारसंघातून नवनाथ गणपत लोखंडे ( गुरसाळे) ; महिला सदस्य गटातून राज्यश्री पंडितराव भोसले( ओझेवाडी) आणि सुशीला दगडू भुसनर( होळे) हे उमेदवार आहेत. इतर मागासवर्गीय उमेदवार नारायण महादेव जाधव( फुलचिंचोली), तर भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रवर्गातून बाळासाहेब कृष्णा गडदे( तरटगाव) या उमेदवारांना संधी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *